शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये आता फेरीवाल्यांची होणार निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 00:47 IST

शहरातील फेरीवाला हा खरे तर उपेक्षित आणि असंघटित घटक, परंतु त्यांना आता संघटित करून त्यांच्यासाठीच शहर फेरीवाला समिती गठित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठी कामगार उपआयुक्त कार्यालयामार्फत रीतसर निवडणुका घेण्यात येणार आहे.

नाशिक : शहरातील फेरीवाला हा खरे तर उपेक्षित आणि असंघटित घटक, परंतु त्यांना आता संघटित करून त्यांच्यासाठीच शहर फेरीवाला समिती गठित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठी कामगार उपआयुक्त कार्यालयामार्फत रीतसर निवडणुका घेण्यात येणार आहे. त्यासाठी मतदार फेरीवाल्यांची खातरजमा केली जात असून, साडेनऊ हजार फेरीवाल्यांची यादी तयार झाल्यानंतर ही निवडणूक कामगार उपआयुक्त कार्यालयात होणार आहे.नाशिक शहरात यापूर्वी नगरपालिका काळात फेरीवाल्यांना परवाने देण्यात आले होते. त्यानंतर फेरीवाला क्षेत्राची सातत्याने होत असलेली मागणी केंद्र सरकारच्या फेरीवाला धोरणामुळे पूर्ण होत आहे. नाशिक शहरात एकूण अडीचशे फेरीवाला क्षेत्र तयार करण्यात आले असून, त्यातील ८७ क्षेत्रातील वाद किंवा आक्षेप वगळता अन्य ठिकाणी फेरीवाले स्थलांतरितदेखील झाले आहेत. महापालिकेने खासगी संस्थेमार्फत व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केल्यानंतर एकूण ९ हजार ६०० फेरीवाल्यांची नोंद झाली असून, त्यांनाच या क्षेत्रात महापालिका सामावून घेतले जात आहे. फेरीवाला धोरणाचा एक भाग म्हणून शहर फेरीवाला समितीचे पुनर्गठन होणार असून त्यासाठी फेरीवाल्यांना त्यांचेच प्रतिनिधी निवडून देण्यासाठी अन्य संस्थांच्या निवडणुकांप्रमाणेच निवडणुका घेण्यात येणार आहे. यासंदर्भात महापालिकेच्या वतीने साडेनऊ हजार फेरीवाल्यांच्या बायोमेट्रिक हजेरी घेऊन खातरजमा करण्यात येत आहे. हे काम संपल्यांनतर सर्व यादी कामगार उपआयुक्त कार्यालयाकडे पाठविली जाणार आहे. तीच मतदार म्हणून मान्य करून हरकती व सूचना मागविण्याबरोबरच निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात येणार आहे. अन्य निवडणुकांप्रमाणेच उमेदवारीसाठी अटी, नियम असतील आणि पॅनलदेखील उभे करून निवडणुका लढविता येणार आहे. त्यामुळे लवकरच आता शहर फेरीवाला समितीसाठी पडघम वाजू लागणार आहे.सध्याची प्रशासन नियुक्त समितीयापूर्वीची शहर फेरीवाला समिती महापालिकेने अर्ज मागवून गठित केली. परंतु त्यावरही काही आक्षेप आहेत, परंतु आता त्यापुढे जाऊन सर्वांनाच या निवडणुकीत सहभागी होता येणार आहे. नाशिक शहरात विविध राजकीय पक्ष प्रणित फेरीवाला संघटना असून, त्यांना आता ही निवडणूक नांदी ठरणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक