शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

बनावट नोटाप्रकरणी नाशिक-वलसाड पोलीस 'साथ-साथ'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 16:58 IST

दोन्ही जिल्ह्यांच्या पोलीस प्रमुखांनी एक विशेष पथक या गुन्ह्याच्या तपासासाठी नियुक्त केले आहे. आपआपसांत समन्वय साधून गुजरात-महाराष्ट्र सीमेवरील वलसाड जिल्ह्यासह नाशिकच्या सुरगाणा, पेठ तालुक्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

ठळक मुद्देविशेष पथकाची नियुक्तीसीमावर्ती भागात बनावट नोटांची 'चलती'सुरगाणा पोलीस सातत्याने संपर्कात असल्याचा दावा

नाशिक : सुरगाणा तालुक्यातील गुजरातच्या सीमेवरील आदिवासी गावे, पाड्यांवर बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा गैरप्रकार वलसाड पोलिसांनी उघडकीस आणला आहे. दरम्यान, वलसाड-सुरगाणा पोलीस ठाण्यांचे पोलीस अधिकारी, कर्मचारी हे सातत्याने एकमेकांच्या संपर्कात असून बनावट नोटांच्या प्रकरणाची पाळेमुळे उखडून फेकण्यासाठी दोन्ही जिल्ह्यांचे पोलीस प्रयत्नशील असल्याचा दावा नाशिक ग्रामिण पोलिसांकडून केला जात आहे.सुरगाणा तालुक्यातील गुजरातच्या सीमेला लागून असलेल्या गुही, मांदा, मोरचोंड येथून चौघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच वलसाड जिल्ह्यातून चार असे एकुण आठ संशयित आरोपी या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी गजाआड केले आहे. दरम्यान, वलसाडचे पोलीस अधिक्षक राजदीपसिंह झाला आणि नाशिकचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील हे एकमेकांच्या सतत संपर्कात असून वलसाड, धरमपुर पोलिसांना आवश्यक ती सर्व मदत बनावट नोटांच्या गुन्ह्याच्या तपासासाठी सुरगाणा पोलिसांकडून केली जात असल्याचे पाटील यांनी सांगितले. सुरगाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक यांना वलसाड वरीष्ठ पोलीस निरिक्षकांच्या संपर्कात राहण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. दोन्ही जिल्ह्यांच्या पोलीस प्रमुखांनी एक विशेष पथक या गुन्ह्याच्या तपासासाठी नियुक्त केले आहे. आपआपसांत समन्वय साधून गुजरात-महाराष्ट्र सीमेवरील वलसाड जिल्ह्यासह नाशिकच्या सुरगाणा, पेठ तालुक्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. बनावट नोटांप्रकरणी धरमपुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला गेला आहे.सराईत गुन्हेगारासह सेतु चालक सहभागीबनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रतपा करणाऱ्यांमध्ये सुरागाण्यातील संशयित सराईत गुन्हेगार हरिदास चौधरी याच्यासोबत उंबरठाण येथे सेतु कार्यालय चालविणारा संशयित अनिल बोचल हादेखील सहभागी असल्याचे पोलीस तापासात समोर आले आहे. पोलिसांनी यांच्यासह त्यांच्या दोन साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत. चौधरीविरुध्द यापूर्वी सुरगाणा, धरमपुर, सापुतारा पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. संशयित जयसिंग वळवी, भगवंत डंबाळे यांनाही या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटकfraudधोकेबाजीNote Banनोटाबंदी