शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक- त्र्यंबकरोडवर कारचे टायर फुटल्याने भीषण अपघात, दोन दुचाकीस्वार जागीच ठार 

By नामदेव भोर | Updated: June 20, 2023 16:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क  लोकमत न्यूज नेटवर्क  नाशिक : त्र्यंबकेश्वर नाशिक  मार्गावर भरधाव वेगातील कारचे  टायर फुटून झालेल्या अपघातात दोन ...

लोकमत न्यूज नेटवर्क 

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : त्र्यंबकेश्वर नाशिक  मार्गावर भरधाव वेगातील कारचे  टायर फुटून झालेल्या अपघातात दोन तरुण ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. त्र्यंबकेश्वरकडून नाशिककडे भरधाव वेगात येणाऱ्या कारचे टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कार दुभाजकावर आदळून दुभाजक तोडून दुसऱ्या बाजूच्या लेनवर आल्याने कारने त्र्यंबककडे जाणाऱ्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार जागीच ठार झाले असून नामदेव विठ्ठल शिद आणि सुनील मनोहर महाले अस अपघातात ठार झालेल्या तरुणांचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील हॉटेल संस्कृती  समोर सोमवारी रात्री  ८ वाजेच्या सुमारास त्र्यंबकेश्वरहून नाशिककडे भरधाव वेगात येणाऱ्या होंडा सिटी कार (एमएच २६ एके ३०६१) चे अचानक टायर फुटल्याने कार  रस्त्याच्या दुभाजकावर आदळून नाशिककडून त्र्यंबकेश्वरच्या दिशेने रस्त्यावर आल्याने या रस्त्यावर  समोरून येणाऱ्या दोन दुचाकींना कारने जोरदार धकड दिली. अपघाताची ही थरारक घटना हॉटेलच्याच सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून यात हॉटेल बाहेरच रोडच्या कडेला उभी असलेली एक व्यक्ती थोडक्यात बचावला आहे. तर कारच्या धडकेत राजेवाडी येथील नामदेव विठ्ठल शिद आणि वाढोली येथील सुनील मनोहर महाले या दुचाकी चालकांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Accidentअपघात