ऑनलाइन लोकमत
दिंडोरी (नाशिक), दि. 31 - नाशिकमधील कोकणगाव येथे मंगळवारी (30 मे) मध्यरात्री एकाच कुटुंबातील तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
एक दाम्पत्य आणि त्यांचा मुलगा अशा एकाच कुटुंबातील तीन जणांची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. जगन मुरलीधर शेळके, शोभा जगन शेळके आणि हर्षद जगन शेळके अशी मृतांची नावं आहेत.
दरम्यान, या तिघांची हत्या करण्यामागील कारणं अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. तसंच घटनास्थळ आणि आसपास परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
वणी पोलीस व नाशिक ग्रामीण पोलिसांकडून तपासकार्य सुरू आहे.