शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

नाशिककरांनी फेकला दहा हजार टन कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 3:52 PM

नाशिक : दिवाळी आली की घरोघरी साफसफाईला सुरुवात केली जाते. छताला लागलेली जाळे-जळमटी काढण्यापासून ते भंगार साहित्य फेकून देण्याची लगबग पहायला मिळते. यंदा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गेल्या १७ दिवसांत घरोघरी झालेल्या साफसफाईच्या माध्यमातून नाशिककरांनी तब्बल दहा हजार टन कचरा घराबाहेर फेकला आहे. या साफसफाईमुळे भंगार व्यावसायिकांचे चांगभलं तर झालेच शिवाय, घंटागाडी ...

ठळक मुद्दे सतरा दिवसांची आकडेवारी  दिवाळीच्या साफसफाईतून कंत्राटदारांची कमाई

नाशिक : दिवाळी आली की घरोघरी साफसफाईला सुरुवात केली जाते. छताला लागलेली जाळे-जळमटी काढण्यापासून ते भंगार साहित्य फेकून देण्याची लगबग पहायला मिळते. यंदा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गेल्या १७ दिवसांत घरोघरी झालेल्या साफसफाईच्या माध्यमातून नाशिककरांनी तब्बल दहा हजार टन कचरा घराबाहेर फेकला आहे. या साफसफाईमुळे भंगार व्यावसायिकांचे चांगभलं तर झालेच शिवाय, घंटागाडी ठेकेदारांसह खतप्रकल्पचालकाचीही कमाई झाली आहे.दीपोत्सवात घरोघरी लक्ष्मीचे आगमन व्हावे यासाठी घरातील कोपरा न कोपरा स्वच्छ केला जातो. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिना-पंधरा दिवस अगोदर घरोघरी साफसफाई मोहिमेला वेग येतो. शहरात महापालिकेमार्फत कचरा उचलण्यासाठी २०६ घंटागाड्यांची व्यवस्था कार्यरत आहे. या घंटागाड्यांमार्फत प्रतिदिन सरासरी सुमारे ४५० टन कचरा खतप्रकल्पावर वाहून नेला जातो. महापालिकेने जानेवारी २०१७ पासून खतप्रकल्पही खासगी कंपनीला चालवायला दिलेला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या साफसफाईतून घराबाहेर काढण्यात आलेल्या कचºयाची आकडेवारी पाहिल्यास दि. १ ते १७ आॅक्टोबर या कालावधीत तब्बल साडेदहा हजार टन कचरा खतप्रकल्पावर वाहून नेण्यात आला आहे. या कालावधीत सरासरी प्रतिदिन ६५० टन कचरा निघाला आहे. प्रतिदिन सुमारे २०० टन कचरा अधिक निघाला आहे. आकडेवारीनुसार, दैनंदिन कचºयाव्यतिरिक्त १७ दिवसांत सुमारे ४ हजार टन जादा कचरा नाशिककरांनी घराबाहेर काढला आहे. १ ते १५ आॅक्टोबर या कालावधीत खतप्रकल्पावर घंटागाड्यांच्या ३४३८ फेºया झालेल्या आहेत. महापालिकेकडून घंटागाड्यांना टनानुसार कचºयाचा मोबदला दिला जातो. दिवाळीत जादा कचºयाची वाहतूक झाल्याने ठेकेदारांना जादा कमाई झाली असून, खतप्रकल्प चालविणाºया कंपनीचीही ‘दिवाळी’ साजरी झाली आहे. प्राप्त आकडेवारीनुसार, दि. १ आॅक्टोबरला ६४१ टन, दि. २- ६०२ टन, दि. ३-६१० टन, दि. ४- ५६७ टन, दि. ५ -५५८ टन, दि. ६- ५५२ टन, दि. ७- ५८१ टन, दि. ८-६५० टन, दि. ९-६४४ टन, दि. १०- ६३७ टन, दि. ११- ६२७ टन, दि. १२- ६१७ टन, दि. १३- ५९४, दि. १४- ६१८ टन आणि दि. १५-६६६ टन कचरा खतप्रकल्पावर वाहून नेण्यात आला आहे.