शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांची बदली, उपायुक्त संजय बारकुंड धुळ्याचे एसपी

By अझहर शेख | Updated: October 20, 2022 23:00 IST

अधीक्षक दर्जाच्या २४ अधिकाऱ्यांच्या शासनाने बदल्या

नाशिक: राज्याच्या गृह विभागाने पोलीस अधीक्षक दर्जाच्या भापोसे व रापोसे अधिकाऱ्यांची बदली व पदस्थापनेबाबतचे आदेश गुरुवारी (दि.२०) काढले. नाशिक ग्रामिणचे पोलीस अधिक्षक सचिन अशोक पाटील यांची बदली करण्यात आली आहे. तसेच पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे उपायुक्त संजय बारकुंड यांचीही पदोन्नतीने धुळे अधीक्षकपदी पदस्थापना करण्यात आली आहे.

भारतीय पोलीस सेवा व राज्य पोलीस सेवेतील अधीक्षक दर्जाच्या २४ अधिकाऱ्यांच्या शासनाने बदल्या केल्या आहेत. यामध्ये काही अधिकाऱ्यांची पदोन्नतीने नव्याने पदस्थापनाही करण्यात आली आहे. नाशिक ग्रामीणचे अधीक्षक सचिन पाटील यांच्या बदलीबाबत चर्चा सुरू होती. गेल्या वर्षी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच शासनाकडून पाटील यांची बदली करण्यात आली होती. यामुळे पाटील यांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणात (कॅट) धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण काही दिवसांपुर्वीच पुर्ण झाली आहे.  त्यानुसार राज्य सरकारच्या गृह विभागाकडून औरंगाबादच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पोलीस अधीक्षकपदी नव्याने पदस्थापना करण्यात आली आहे; मात्र त्यांच्या बदलीने रिक्त झालेल्या अधीक्षकपदावर अद्याप कोणाचीही नियुक्ती शासनाने केलेली नाही.

महाराष्ट्र पोलीस अकादमीमधील अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांची सोलापूर ग्रामिणच्या अधीक्षकपदी तर गौरव सिंह यांची यवतमाळच्या अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. बदली आदेशात अन्य १९ पोलीस अधिकाऱ्यांचीही बदली केल्याचे दर्शविण्यात आले आहेत. मात्र त्यांच्या बदलीनुसार नव्याने पदस्थापनेचे आदेश अद्याप काढण्यात आलेले नाही, ते स्वतंत्रपणे काढण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसTransferबदलीNashikनाशिक