- संजय पाठक नाशिक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काळे झेंडे दाखवण्याचा इशारा उध्दव सेनेने दिला खरा, मात्र पोलीसांनी कावाईचा इशारा देताच तलवार मान्य करण्यात आली आणि फडणवीस यांचीच भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. त्यामुळे उध्दव सेनेतच हा चर्चेचा विषय ठरला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नाशिकच्या दौऱ्यावर होते. राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर कुंभमेळ्याची कामे संथगतीने होत आहेत अद्याप पालकमंत्री नियुक्त नाही अशी कारणे देत उध्दव सेनेचे नवनियुक्त जिल्हा प्रमुख डी. जी. सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला हेाता. मात्र, पोलीसांनी त्यांना आंदेालन केल्यास कारवाईचा ईशारा दिला. त्यामुळे त्यांनी तलवार म्यान केली आणि पेालीसांच्या मध्यस्थीनेच कुंभमेळ्याची कामे लवकर करावी अशा मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी जिल्हा प्रमुख डी. जी. सूर्यवंशी, पक्षाचे उपनेते सुनील बागूल, माजी महापौर विनायक पांडे, सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, संदेश फुले, सचिन बांडे आदी उपस्थित होते.