शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक ग्रामीण पोलिसांकडून अटक: प्रियकर व भावाच्या मदतीने पतीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 22:57 IST

ओझर गावातील समतानगर भागात राहणाऱ्या निर्मला ऊर्फ ज्योती चंपालाल जाट या संशयित महिलेने पती चंपालाल जाट यांचा प्रियकर रमेश साहेबराव सोनवणे व भाऊ कैलास भिला पुणेकर (रा. जेलरोड) यांच्या मदतीने मंगळवारी (दि.३) काटा काढला.

ठळक मुद्देओम्नी मोटारीतून (एम.एच.१५, बीडब्ल्यू ५८६६) मनमाडकडे घेऊन गेले.

नाशिक : प्रियकर व भावाच्या मदतीने पतीचा खून केल्याची घटना निफाड तालुक्यातील बोकडदरे शिवारात घडली होती. औरंगाबाद-नाशिक महामार्गावर एका पुरुष जातीचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला. या गुन्ह्यात ग्रामीण पोलिसांनी पत्नीसह संशयित प्रियकर व तिच्या भावाला अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ओझर गावातील समतानगर भागात राहणाऱ्या निर्मला ऊर्फ ज्योती चंपालाल जाट या संशयित महिलेने पती चंपालाल जाट यांचा प्रियकर रमेश साहेबराव सोनवणे व भाऊ कैलास भिला पुणेकर (रा. जेलरोड) यांच्या मदतीने मंगळवारी (दि.३) काटा काढला. चंपालाल यांना नातेवाइकांकडे जायचे आहे, असे सांगून त्यांची मारुती ओम्नी मोटारीतून (एम.एच.१५, बीडब्ल्यू ५८६६) मनमाडकडे घेऊन गेले. तेथून पुन्हा नाशिकच्या दिशेने येताना मध्यरात्रीच्या सुमारास सोनवणे व पुणेकर यांनी मिळून चंपालाल यांच्यावर धारदार शस्त्राने वार करत अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. वर्मी घाव लागल्याने चंपालाल यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे प्रेत अर्धवट जळालेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आले होते. या गंभीर गुन्ह्याच्या तपासचक्रे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी गुन्हे शाखेच्या पथकाला वेगाने फिरविण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक अशोक करपे यांनी गोपनीय बातमीदाराकडून माहिती घेऊन ओझर येथून संशयित सोनवणे याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्याचा साथीदार गांगुर्र्डे व संजय कारभारी बाविस्कर यांनाही गुन्ह्यात सहभाग असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतले. 

 

टॅग्स :NashikनाशिकCrimeगुन्हाMurderखूनArrestअटकOzarओझर