शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

नाशिकरोडला वाहनातून पावणेचार लाखांची रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 00:08 IST

दत्तमंदिर सिग्नलजवळील आर्चिस गॅलरीजवळ झाडाखाली लावलेल्या मारुती इको गाडीची पुढील दरवाजाची काच फोडून अज्ञात चोरट्याने पावणेचार लाखांची रोकड चोरून नेली.

नाशिकरोड : दत्तमंदिर सिग्नलजवळील आर्चिस गॅलरीजवळ झाडाखाली लावलेल्या मारुती इको गाडीची पुढील दरवाजाची काच फोडून अज्ञात चोरट्याने पावणेचार लाखांची रोकड चोरून नेली.सातपूर पपया नर्सरीमागील राजमुद्रा अपार्टमेंटमध्ये राहणारे आयएसपी प्रेस कामगार चंद्रकांत सुधाकर हिंगमिरे यांनी बहिणीच्या मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता पंजाब नॅशनल बॅँकेच्या खात्यातून चार लाख रुपये काढले. त्यातील २० हजार रुपये हिंगमिरे यांनी स्वत:च्या खिशात ठेवून ३ लाख ८० हजार रुपयांची रोकड कापडी पिशवीत ठेवून त्यांच्या मारुती इको (एमएच १५ सीएम ९५३६) हिच्या चालकाशेजारील शिटवर ठेवली. तेथून हिंगमिरे हे पवन हॉटेलजवळील एका बॅँकेत दहा-दहा रुपयांचे सुट्टे घेण्यासाठी गेले होते. मात्र त्यांना सुट्टे पैसे मिळू शकले नाही. तेथुन हिंगमिरे हे जेलरोड व जयभवानीरोड येथे कामाकरिता गेले होते.दुपारी साडेतीनच्या सुमारास हिंगमिरे यांनी दत्तमंदिर सिग्नलजवळील आर्चिस गॅलरीसमोरील झाडाखाली मारूती इको गाडी लावून समोरच बिझनेस बॅँकेत सुट्टे आणण्यासाठी गेले. काही वेळात सुट्टे पैसे घेऊन हिंगमिरे पुन्हा आपल्या गाडीकडे आले असता त्यांना चालकाशेजारील दरवाजाची काच फोडून शिटवर कापडी पिशवी ठेवलेली ३ लाख ८० हजार रुपयांची रोकड चोरीस गेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Policeपोलिसtheftचोरी