नाशिकरोड : कार्यालयातच देवाण-घेवाण; वरिष्ठ अधिकाºयांकडून मात्र प्रकरणाकडे दुर्लक्ष पुरवठा निरीक्षकाची पैशांची क्लिप व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 01:01 AM2017-12-02T01:01:09+5:302017-12-02T01:02:52+5:30

शहर धान्य वितरण कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षकाने चलन भरण्यासाठी आलेल्या रेशन दुकानदारांकडे उघड उघड पैशांची मागणी केल्याची व्हिडीओ चित्रफीत फेसबुकवर व्हायरल झाल्याने त्याची जोरदार चर्चा रेशन दुकानदारांमध्ये

Nashik Road: Commuting in the office; Only the senior officials of the case, the watch inspector's money clips viral | नाशिकरोड : कार्यालयातच देवाण-घेवाण; वरिष्ठ अधिकाºयांकडून मात्र प्रकरणाकडे दुर्लक्ष पुरवठा निरीक्षकाची पैशांची क्लिप व्हायरल

नाशिकरोड : कार्यालयातच देवाण-घेवाण; वरिष्ठ अधिकाºयांकडून मात्र प्रकरणाकडे दुर्लक्ष पुरवठा निरीक्षकाची पैशांची क्लिप व्हायरल

Next
ठळक मुद्दे पदभार देऊन वरिष्ठांनी उपकृत केलेचलन पास करण्यासाठी चिरीमिरी स्पष्ट कारवाई शक्यतेविषयी साशंकता

नाशिक : शहर धान्य वितरण कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षकाने चलन भरण्यासाठी आलेल्या रेशन दुकानदारांकडे
उघड उघड पैशांची मागणी केल्याची व्हिडीओ चित्रफीत फेसबुकवर व्हायरल झाल्याने त्याची जोरदार चर्चा रेशन दुकानदारांमध्ये होत असून, या साºया प्रकाराबाबत मात्र वरिष्ठ अधिकाºयांनीही सोयीस्कर काणाडोळा केल्याने त्यांचीच यामागे फूस असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, सदर कार्यालयीन अधीक्षकाने आजवरचा सेवा कालावधी पुरवठा खात्याच्या चरणीच घातल्यामुळे की काय मर्जी म्हणून त्यांच्याकडे पुरवठा निरीक्षकाचा अतिरिक्त पदभार देऊन वरिष्ठांनी उपकृत केले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून फेसबुक वर सदरची चित्रफीत व्हायरल झाल्याने पुरवठा खात्यात सारेच आलबेल आहे असे नसून आजवर केल्या जाणाºया पुरवठा खात्यातील भ्रष्टाचारावर त्यामुळे शिक्कामोर्तब झाले आहे. रेशन दुकानदारांकडून नागरिकांचे आधारकार्ड गोळा करून त्याची संगणकात नोंद करण्याचे काम पुरवठा खात्याकडून केले जात आहे. सदर काम ठेकेदाराकरवी व पुरवठा खात्याच्या निधीतून केले जाणार असले तरी, या कामासाठी संबंधित दुकानदारांनी पैसे द्यावेत, असा आग्रह पुरवठा खात्याकडून धरला जात आहे. याचाच संदर्भ या चित्रफितीत आहे तसेच चलन पास करण्यासाठी द्यावी लागणारी चिरीमिरीदेखील त्यातून स्पष्ट झाली आहे. शहर धान्य वितरण कार्यालयात कार्यालयीन अधीक्षक असलेले शेख यांच्याविषयी यापूर्वीही तक्रारी झाल्या असून, त्यांच्या विरोधात यापूर्वी काही दुकानदारांनी उपोषणास्त्र उगारूनही त्याला पाठीशी घालण्यात आल्याने आत्ताही चित्रफीत व्हायरल होऊनही शेख याच्यावर कारवाई होण्याच्या शक्यतेविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Nashik Road: Commuting in the office; Only the senior officials of the case, the watch inspector's money clips viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.