शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककरांना उन्हाचा चटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 02:22 IST

नाशिक : शहराच्या तापमानात सातत्याने वाढ होत असून रविवारपाठोपाठ नाशिककरांना सोमवारीही (दि.१) उन्हाचा तडाखा बसला. दिवसभर वाऱ्याचा मंदावलेला वेग अन‌् उन्हाच्या जाणवणाऱ्या अतितीव्र झळांमुळे नाशिककर घामाघूम झाले होते. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शहरातील बहुतांश रस्ते ओस पडले होते. कमाल तापमानाचा पारा संध्याकाळी ३५.९ अंशांपर्यंत स्थिरावल्याची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली.

ठळक मुद्देपारा ३५.९ अंशांवर : तापमानात वाढ झाल्याने झळा अधिक तीव्र

नाशिक : शहराच्या तापमानात सातत्याने वाढ होत असून रविवारपाठोपाठ नाशिककरांना सोमवारीही (दि.१) उन्हाचा तडाखा बसला. दिवसभर वाऱ्याचा मंदावलेला वेग अन‌् उन्हाच्या जाणवणाऱ्या अतितीव्र झळांमुळे नाशिककर घामाघूम झाले होते. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शहरातील बहुतांश रस्ते ओस पडले होते. कमाल तापमानाचा पारा संध्याकाळी ३५.९ अंशांपर्यंत स्थिरावल्याची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली.नाशिककरांना आठवडाभरापासून उन्हाळा जाणवत आहे. शहराचे वातावरण कमालीचे ह्यहॉटह्ण होत असून कमाल तापमानात वाढ होत आहे. मागील आठवड्यात तिशीचा टप्पा गाठलेल्या तापमानाने आता ३५ अंशांपुढे वाटचाल सुरू केल्याने नाशिककरांना उष्म्याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. शनिवारी कमाल तापमानाचा पारा ३५.५ अंशांवर होता; मात्र रविवारपासून यामध्ये आणखी वाढ होऊ लागल्याने प्रखर उन्हाचा चटका नागरिकांना जाणवत आहे.

यासोबतच किमान तापमानदेखील सोमवारी १७.५ अंशांवर पोहोचले. शनिवारच्या तुलनेत कमाल-किमान तापमानात वाढ झाल्यामुळे नागरिकांना सोमवारी अधिकच उकाडा सहन करावा लागला. रात्रीदेखील थंड वाऱ्यांचा वेग कमीच राहिल्याने वातावरणात फारसा गारवा जाणवत नव्हता. मागील तीन वर्षांच्या तुलनेत या वर्षी प्रखर उन्हाळा राहणार असल्याची चिन्हे आताच दिसू लागली आहेत.

मार्च महिन्याला सोमवारपासून सुरुवात झाली असून कमाल तापमानात अधिक वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. विशेष म्हणजे २०१८ साली २८ फेब्रुवारी रोजी ३५.८ अंश इतके कमाल तापमान नोंदविले गेले होते. याची पुनरावृत्ती रविवारीही झाली. या वर्षीही रविवारी (दि. २८) ३५.८ इतक्याच कमाल तापमानाची नोंद झाली. या वर्षीही उन्हाच्या झळा अधिक तीव्र राहणार असल्याचे संकेत निसर्गाने दिले आहेत. यामुळे नागरिकांना आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलHealthआरोग्य