शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक प्रादेशिक परिवहन विभाग  महसूल उत्पन्नात राज्यात द्वितीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:47 IST

प्रादेशिक परिवहन विभागाने सुरू केलेल्या कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) अर्थात आपले सरकार या सेवा केंद्रातील विविध सेवांचा जिल्ह्यातील २८ हजार ८४९ नागरिकांनी लाभ घेता असून, याद्वारे ४ कोटी १८ लाख ४ हजार १५१ रुपयांचा महसूल मिळाला आहे़

नाशिक : प्रादेशिक परिवहन विभागाने सुरू केलेल्या कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) अर्थात आपले सरकार या सेवा केंद्रातील विविध सेवांचा जिल्ह्यातील २८ हजार ८४९ नागरिकांनी लाभ घेता असून, याद्वारे ४ कोटी १८ लाख ४ हजार १५१ रुपयांचा महसूल मिळाला आहे़ ठाणे जिल्ह्यापाठोपाठ हा द्वितीय क्रमांकाचा महसूल असून, एसएससी केंद्रामुळे घराजवळच आरटीओच्या सेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांची मोठी सोय झाली आहे़  आपले सरकार या सेवा केंद्रामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात जाण्याची गरज भासत नसून त्यांची कामे आनॅलाइनद्वारे सुलभ पद्धतीने होतात़ प्रादेशिक विभागाने काही दिवसांपूर्वीच सुरू केलेल्या या सेवेमध्ये प्रत्येक कामासाठीचे शासकीय शुल्क निश्चित केले असून, याद्वारे संबंधित विभागाला महसूल मिळतो़ प्रादेशिक परिवहन विभागातील कामासाठी जिल्ह्यातील २८ हजार ८४९ नागरिकांनी ५९७ सीएससी केंद्राद्वारे कामे केली आहेत़ ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाची ३४४ सीएससी केंद्र असून, त्याचा ३१ हजार ८६६ नागरिकांनी लाभ घेऊन ६ कोटी ३५ लाख ५० हजार २० रुपयांचा राज्यातील सर्वाधिक महसूल मिळवून दिला आहे़ त्याखालोखाल नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा क्रमांक आहे़ विशेष म्हणजे यामुळे आरटीओतील एजंटगिरीला चाप बसला असून, नागरिकांचे हेलपाटे वाचले आहेत़ दरम्यान, भविष्यात या केंद्राची संख्या आणखीन वाढविली जाणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दिली आहे़२४ कोटी २८ लाखांचा महसूलप्रादेशिक परिवहन विभागाचे राज्यभरात चार हजार ३७६ केंद्र असून, त्याचा १ लाख ९९ हजार ३३३ नागरिकांनी लाभ घेतला आहे़ यामुळे आरटीओस २४ कोटी २८ लाख ४८ हजार ४५७ रुपयांचा महसूल मिळाला आहे़

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसNashikनाशिक