शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये जुलूस-ए-गौसिया उत्साहात; शेकडो मुस्लीम बांधव सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 18:07 IST

अग्रभागी सजविलेल्या जीपमध्ये खतीब मिरवणूकीचे नेतृत्व करीत होते. त्यांच्यासोबत शहर-ए-काझी सय्यद मोईजोद्दीन, हाजी वसीम पिरजादा होते. तसेच गौस ए आझम यांच्या जीवनकार्याविषयीची माहिती हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी देत होते.

ठळक मुद्देफातिहा व दरूदोसलामचे पठण करुन मिरवणूकीचा समारोप मिरवणूक मार्ग हिरवे झेंडे, आकर्षक होर्डिंग्ज उभारून सजविण्यात आला होता

नाशिक : मुस्लीम समाजाचे ज्येष्ठ धर्मगुरू सुफी संत हजरत शेख अब्दुल कादिर जीलानी ऊर्फ गौस-ए-आझम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जुने नाशिक परिसरासह वडाळागावातून ‘जुलूस-ए-गौसिया’ मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.जुने नाशिकमधून शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते. चौक मंडई येथून दुपारी चार वाजता मिरवणूकीला प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी अशरफी यांनी देशाच्या प्रगती व कल्याणासाठी तसेच शांतता व एकात्मता जोपासली जावी, याकरिता प्रार्थना केली. यावेळी उपस्थितांनी ‘आमिन’ म्हणत त्यांच्या प्रार्थनेला पाठिंबा दिला. यावेळी मिरवणूकीत जुने नाशिकसह विविध उपनगरांमधील धार्मिक- सामाजिक मित्र मंडळांनी सहभाग नोंदविला होता. तसेच मदरसा गौस-ए-आझम, मदरसा सादिकुल उलूमचे विद्यार्थी पारंपरिक पोशाखात सहभागी होऊन शिस्तबध्द संचलन करीत होते. प्रत्येक मंडळांच्या कार्यकर्त्याकडून दरूदोसलाम व गौस-ए-आझम यांच्यावर आधारित स्तुतीपर काव्य म्हटले जात होते. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी विविध मंडळांनी धर्मगुरूंचे स्वागत केले. मिरवणूक मार्ग हिरवे झेंडे, आकर्षक होर्डिंग्ज उभारून सजविण्यात आला होता. अग्रभागी सजविलेल्या जीपमध्ये खतीब मिरवणूकीचे नेतृत्व करीत होते. त्यांच्यासोबत शहर-ए-काझी सय्यद मोईजोद्दीन, हाजी वसीम पिरजादा होते. तसेच गौस ए आझम यांच्या जीवनकार्याविषयीची माहिती हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी देत होते.मिरवणूक चौक मंडई, बागवानपुरा, कथडा, शिवाजी चौक, आझाद चौक, चव्हाटा, बुधवार पेठ, काजीपुरा, कोकणीपुरा, खडकाळीवरून शहीद अब्दूल हमीद चौकातून मार्गस्थ होत बडी दर्गाच्या प्रारंगणात पोहचली. या ठिकाणी धर्मगुरूंनी प्रवचन दिले. फातिहा व दरूदोसलामचे पठण करुन मिरवणूकीचा समारोप करण्यात आला. दरम्यान, पुर्वसंध्येला मुस्लीम बांधवांनी घरांमध्ये विशेष ‘मलिदा’ हे खाद्यपदार्थ तयार करुन फातिहा पठण केले.

 

टॅग्स :Muslimमुस्लीमNashikनाशिक