शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

नाशिक पोलीस : चोरीला गेलेल्या मौल्यवान वस्तू परत मिळतात तेव्हा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 15:49 IST

शहरातील भद्रकाली, सरकारवाडा, पंचवटी, गंगापूर, आडगाव, म्हसरुळ, मुंबईनाका, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड, देवळाली कॅ म्प, सातपुर, अंबड या सर्व पोलीस ठाण्यांमधील विविध गुन्ह्यांची उकल करुन सुमारे २० लाख २५ हजार ४३२ रुपयांचा मुद्देमाल पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांच्या हस्ते समारंभपुर्वक प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्देआठ लाख ५६ हजार २८७ रुपये किंमतीच्या २२ दुचाकी ८ लाख ५६ हजार २८७ रुपये किंमतीच्या १२ सोनसाखळी १ लाख ६८ हजार रुपयांचे ९ मोबाईल

नाशिक : हरविलेली वस्तू पुन्हा सापडणे कदाचित शक्य असते; मात्र चोरी गेलेली मौल्यवान वस्तू पुन्हा काही दिवसांनी हाती पडेल, अशी भाबडी आशाही कोणी सहसा बाळगत नाही. कारण चोरट्याने चोरी केलेली वस्तू परत मिळणार कशी? या प्रश्नाने सर्वसामान्यांच्या मनात घर करणे सहाजिकच आहे; मात्र नाशिक पोलिसांनी आॅक्टोबर ते डिसेंबर महिन्यात शहरात पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडलेल्या सोनसाखळी, दुचाकी चोरी, मोबाईल चोरी, घरफोडीच्या विविध गुन्ह्यांची उकल करुन संशयितांच्या मुसक्याही आवळल्या आणि त्यांच्याकडून चोरीच्या मौल्यवान वस्तू हस्तगत करुन मुळ मालकांना समारंभपुर्वक प्रदान केल्या. यावेळी ज्यांच्या गळ्यातील सौभाग्याचं लेणं चोरीला गेले होते ते हातात सन्मानपुर्वक दिले गेले यावेळी त्या महिलांच्या चेहºयावरील आनंदाचे भाव व पोलिसांविषयीचा वाटणारा अभिमान निराळाच होता.शहरातील भद्रकाली, सरकारवाडा, पंचवटी, गंगापूर, आडगाव, म्हसरुळ, मुंबईनाका, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड, देवळाली कॅ म्प, सातपुर, अंबड या सर्व पोलीस ठाण्यांमधील विविध गुन्ह्यांची उकल करुन सुमारे २० लाख २५ हजार ४३२ रुपयांचा मुद्देमाल पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांच्या हस्ते समारंभपुर्वक प्रदान करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून ‘महाराष्ट टाईम्स’चे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे उपस्थित होते. तसेच व्यासपिठावर उपआयुक्त विजयकुमार मगर, लक्ष्मीकांत पाटील, श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे आदि उपस्थित होते.दरम्यान, कोकाटे व मगर यांनी उपस्थित नागरिकांना विविध गुन्हयांच्या घटनांपासून कशी सावधगिरी बाळगावी याविषयी मार्गदर्शन केले. तसेच आधुनिकतेच्या काळात इंटरनेटच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारीविषयीदेखील नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे असल्याचे कोकाटे म्हणाले.यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात मुद्देमाला परत मिळालेल्या नागरिकांपैकी अमोल जाधव, जाकीर काजी, सोनल रसाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी आठ लाख ५६ हजार २८७ रुपये किंमतीच्या २२ दुचाकी, ८ लाख ५६ हजार २८७ रुपये किंमतीच्या १२ सोनसाखळी, १ लाख ६८ हजार रुपयांचे ९ मोबाईल संबंधित मुळ मालकांना वाटप करण्यात आले.प्रास्ताविक लक्ष्मीकांत पाटील यांनी केले, सुत्रसंचालन सहायक आयुक्त अशोक नखाते यांनी केले व आभार माधुरी कांगणे यांनी मानले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय