शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा भाऊ साठे जयंती : मिरवणूकीने वेधले नाशिककरांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 21:28 IST

भद्रकाली टॅक्सी थांबा मातंगवाडा येथील तरुण मित्र मंडळाने आकर्षक सजावट केलेला चित्ररथ लक्षवेधी ठरला. तसेच मखमलाबाद नाका येथील वरदविनायक ढोल-ताशा पथकाच्या वादक आणि क्रांतीवर लहुजी वस्ताद बहुउद्देशीय संस्थेचे मंडळ मिरवणूकीचे आकर्षण ठरले.

ठळक मुद्दे तरुण मित्र मंडळाने आकर्षक सजावट केलेला चित्ररथ लक्षवेधी ठरला.

नाशिक : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जुने नाशिकमधील बागवानपुरा येथील महात्मा फुले चौकातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत शहर व परिसरातील सुमारे दहा मंडळांचे चित्ररथ व कार्यकर्ते सहभागी झाले होते.अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा फुले चौकात फुले यांच्या अर्धकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी मिरवणूकीतील पहिल्या मंडळाच्या चित्ररथापुढे श्रीफळ वाढवून शुभारंभ केला. यावेळी नगरसेवक गजानन शेलार, वत्सला खैरे, आशा तडवी, रामसिंग बावरी, वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर कड, पोलीस निरिक्षक भारतकुमार सुर्यवंशी यांसह विविध मंडळांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान, मिरवणूकीत समाजबांधव पिवळ्या रंगाचा फेटा परिधान करुन सहभागी झाले होते. सहभागी समाजबांधवांनी अण्णाभाऊ यांचा जयघोष करत अभिवादन केले.अग्रभागी लहुजी मित्र मंडळाच्या सजविलेल्या बग्गीमध्ये साठे यांचा अर्धकृती पुतळा होता. भद्रकाली टॅक्सी थांबा मातंगवाडा येथील तरुण मित्र मंडळाने आकर्षक सजावट केलेला चित्ररथ लक्षवेधी ठरला. तसेच मखमलाबाद नाका येथील वरदविनायक ढोल-ताशा पथकाच्या वादक आणि क्रांतीवर लहुजी वस्ताद बहुउद्देशीय संस्थेचे मंडळ मिरवणूकीचे आकर्षण ठरले.मिरवणूक बागवानपुरा, दूध बाजार, शहीद अब्दुल हमीद चौक, भद्रकाली, मेनरोडवरुन शालिमारमार्गे भालेकर शाळेच्या मैदानाला लागून असलेल्या अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ मिरवणूकीचा समारोप करण्यात आला. मिरवणूकीत मोठ्या संख्येने मातंग समाजबांधव सहभागी झाले होते.या मंडळांचा सहभागजय लहुजी मित्र मंडळ, राजीवनगर, बाबासाहेब गोपले बहुउद्देशीय संस्था, अखिल भारतीय मातंग संघ, जय लहुजी मित्रमंडळ, सिडको, साठे मित्र मंडळ, जुने नाशिक मित्र मंडळ, मरीमाता मित्र मंडळ, लहुजी युवा प्रतिष्ठान, लहुजी वस्ताद मित्र मंडळ, सातपूर यांचा मिरवणूकीत सहभाग होता.

टॅग्स :Nashikनाशिक