शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळ कारवाईविरोधी महंतांसह लोकप्रतिनिधीही एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 21:18 IST

महापालिकेत बैठक : फेरसर्वेक्षण करण्याचे महापौरांचे प्रशासनाला आदेश

ठळक मुद्दे८ नोव्हेंबरपासून अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधी कारवाई करण्याची तयारीरस्त्यांवर अडथळा ठरणाऱ्या  १५० अनधिकृत धार्मिक स्थळांना नोटीसा

नाशिक - महापालिकेने येत्या ८ नोव्हेंबरपासून अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधी कारवाई करण्याची तयारी चालविली असतानाच सोमवारी (दि.६) महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येत चुकीच्या सर्वेक्षणावर केल्या जाणाऱ्या  कारवाईला आक्षेप घेतला. यावेळी महापौरांनी स्थानिक नगरसेवकांना सोबत घेऊन फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्यानंतर लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.महापालिकेमार्फत रस्त्यांवर अडथळा ठरणाऱ्या  १५० अनधिकृत धार्मिक स्थळांना नोटीसा बजावण्यात आल्या असून न्यायालयाच्या निर्देशानुसार येत्या १७ नोव्हेंबरपर्यंत डेडलाइन असल्याने दि. ८ नोव्हेंबरपासून मोहीम राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मात्र, महापालिकेने सुरू केलेल्या कार्यवाहीला धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांसह नागरिक, महंत, लोकप्रतिनिधी यांनीही आक्षेप घेतला आहे. सोमवारी (दि.६) महापालिकेतील स्थायी समितीच्या सभागृहात महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, आमदार, गटनेते, मठांचे महंत, धार्मिक स्थळांचे विश्वस्त, कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत, आमदार बाळासाहेब सानप यांनी शहराची शांतता अबाधित राहण्यासाठी विचारपूर्वक कृती करण्याची गरज असून फेरसर्वेक्षणाची सूचना केली. आमदार देवयानी फरांदे यांनी सदर सर्वेक्षण चुकीचे असून पुन्हा सुनावणी घेऊन फेरसर्वेक्षण करण्याची सूचना केली. त्यासाठी एक कृती समिती स्थापन करण्याचीही सूचना त्यांनी केली. राष्टवादी कॉँग्रेसचे गटनेता गजानन शेलार यांनी रहदारीला अडथळे ठरणार असतील तर ती धार्मिक स्थळे स्थलांतरीत करता येतील परंतु, ज्यांना लोकमान्यता आहे आणि रस्त्यात अडथळा नाही, अशा धार्मिक स्थळांवर कारवाई केली जाऊ नये, असे सांगितले. कारवाई प्रसंगी कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही शेलार यांनी दिला. शिवसेना गटनेता विलास शिंदे यांनी महापालिकेने चोरी-छुप्या पद्धतीने धार्मिक स्थळांना नोटीसा बजावल्याचे सांगत फेरसर्वेक्षणाची मागणी केली. मनसेचे गटनेता सलीम शेख यांनी लोकमान्यता असलेल्या धार्मिक स्थळांबाबत पुनर्विचार करण्याची मागणी करतानाच नगररचना विभागाने अनुकुल अभिप्राय दिला असतानाही अतिक्रमण विभागामार्फत नोटीसा चिकटविण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. हिंदु एकता आंदोलनाचे रामसिंग बावरी यांनी रस्त्यांवर अडथळा ठरणारी स्थळे सामोचाराने बाजूला स्थलांतरीत करता येणार असल्याचे सांगत कारवाई थांबविण्याची मागणी केली. महंत भक्तिचरणदास यांनी न्यायालयाचा सन्मान राखून मार्ग काढण्याची विनंती केली मात्र, लोकभावनेच्या श्रद्धेला तडा जाणार नाही, याचीही काळजी घेण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी सुरेश दलोड, नंदन भास्करे यांनीही सूचना केल्या. काही उपस्थित कार्यकर्ते, वकील यांनी नोटीसा चिकटवताना नागरिकांसह स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घेतले नसल्याची तक्रार केली. सरतेशेवटी, महापौर रंजना भानसी यांनी महापालिका प्रशासनाने केलेले सर्वेक्षणच चुकीचे असल्याचा आरोप करत स्थानिक नगरसेवकांना सोबत घेऊन फेरसर्वेक्षण करण्याचे आदेशित केले. प्रशासनाने एक महिन्याच्या आत त्याबाबत शासन आणि न्यायालयाला माहिती अवगत करुन द्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाNashikनाशिक