शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये आता औषधेही मिळू लागली घरपोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 15:26 IST

नाशिक : औषधे हवी आहेत, मग घराबाहेर पडण्याची आता गरज नाही, जिल्हा प्रशासनाने थेट हवी ती औषधे घरपोच देण्यासाठी नवीन सेवा उपलब्ध करून देत त्यासाठी एक स्वतंत्र व्हाट्स अ‍ॅप क्रमांक (९७००००९७५३) जारी केला आहे. त्याचा अनेक जणांनी लाभ घेण्यास प्रारंभ केला आहे.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाकडून सोयघरातच थांबण्यासाठी पर्याय

नाशिक : औषधे हवी आहेत, मग घराबाहेर पडण्याची आता गरज नाही, जिल्हा प्रशासनाने थेट हवी ती औषधे घरपोच देण्यासाठी नवीन सेवा उपलब्ध करून देत त्यासाठी एक स्वतंत्र व्हाट्स अ‍ॅप क्रमांक (९७००००९७५३) जारी केला आहे. त्याचा अनेक जणांनी लाभ घेण्यास प्रारंभ केला आहे.

लॉकडाउन आणि संचारबंदी काळातसुद्धा औषधे खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात विविध उपनगरात घराबाहेर पडत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आले. यामुळे लॉकडाउनचा प्रयोग संपूर्णपणे यशस्वी होऊ शकणार नाही, त्यामुळे प्रशासनाने पुढाकार घेत घरपोच औषधे उपलब्ध करून देण्याची सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. यासाठी एक व्हाट्सअ‍ॅप क्रमांक प्रसारित करण्यात आला असून, त्यावर संपर्क साधल्यास संबंधित रुग्णाला घरपोच औषधे दिली देण्यात येत आहेत.

कोरोना संसर्गाचा प्रसार होऊ नये याकरिता नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. तरीही औषधे, भाजीपाला व तत्सम जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांना घराबाहेर पडावे लागते आहे. अर्थात एरवीपेक्षा घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांचे प्रमाण खूपच अत्यल्प आहे. नागरिकांना घरपोच फळे आणि भाजीपाला मिळावा याकरिता जिल्हा प्रशासनाने एका खासगी पुरवठादार कंपनीच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नागरिक या सुविधेचा लाभ घेत आहेत.

औषधांची दुकाने सुरू असली तरी रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाइकांना या दुकानांपर्यंत सहजतेने पोहोचता येईलच असे नाही. प्रवासी वाहतुकीची साधनेही बंद असून, अनेकांकडे शहरातील औषध दुकानांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणतेही साधन नाही. अशा सर्वच घटकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. दाऊदी बोहरा जमातच्या मार्गदर्शनाखाली सैफी अ‍ॅम्बुलन्स कॉर्पोरेशनने घरपोच औषधे पुरविण्याची तयारी दर्शविली.

या उपक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून पाठबळ दिले आहे. 'घरातच रहा सुरक्षित रहा' असा संदेशही प्रशासनाने दिला आहे. कोणत्याही आजारावरील औषधे शहरातील रुग्णांना घरपोच मिळणार आहेत. याकरिता व्हाट्सअ‍ॅप क्रमांक देण्यात आला आहे. या क्रमांकावर रुग्णाचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक आणि औषधांची प्रिस्क्रिप्शन पाठविल्यास दुसºया दिवशी ही औषधे संबंधित रुग्णाच्या घरी पोहोच केली जातात. या औषधांची मागणी किमान एक दिवस अगोदर करणे अपेक्षित आहे. ही सुविधा केवळ शहरातील रुग्णांसाठीच उपलब्ध आहे. औषधे स्वीकारल्यानंतर त्याचे बिल अदा करावे लागते.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याmedicineऔषधं