शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

nashik: नाशिकच्या दिलीप गावितला पॅरा एशियनमध्ये सुवर्ण; मोदींकडून कौतुक

By धनंजय रिसोडकर | Updated: October 28, 2023 19:10 IST

Nashik: दिलीप महादू गावित याने पॅरा एशियन गेम्समध्ये ॲथलेटीक्स या क्रीडा प्रकारात टी ४७ श्रेणीतील ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये भारताला सुवर्णपदक पटकावून देत चीनमध्ये भारताचे राष्ट्रगीत वाजवण्याचा मान मिळवला.

- धनंजय रिसोडकर नाशिक : दिलीप महादू गावित याने पॅरा एशियन गेम्समध्ये ॲथलेटीक्स या क्रीडा प्रकारात टी ४७ श्रेणीतील ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये भारताला सुवर्णपदक पटकावून देत चीनमध्ये भारताचे राष्ट्रगीत वाजवण्याचा मान मिळवला. दिलीपच्या या कामगिरीमुळे २०२४ च्या पॅरा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला असल्याने याच्या या कामगिरीचे कौतुक थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवर शुभेच्छा देऊन व्यक्त केले आहे.

दिलीप हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील तोरणडोंगरी या आदिवासी पाड्यावरील खेळाडू आहे. उजव्या हातावर कोपरापासुन तो दिव्यांग आहे. गत सात वर्षापासून नाशिकचे ॲथलेटिक्स प्रशिक्षक वैजनाथ काळे यांनी त्याला क्रीडा कामगिरीसाठी दत्तक घेतले होते. दिलीपच्या निवासासह स्पर्धेच्या आणि दैनंदिन सरावातील डाएटचा खर्चदेखील वैजनाथ काळे यांनी गत सात वर्षापासून केलेला आहे. एशियन स्पर्धेत थेट सुवर्णपदक पटकावल्यामुळे दिलीप हा २०२४ मध्ये पॅरिसच्या पॅरा ऑलिम्पिक या स्पर्धेसाठी देखील पात्र झाला आहे. त्यामागे दिलीपसह प्रशिक्षक वैजनाथ काळे यांचे सात वर्षांपासूनचे अथक प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत. अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे दिलीपने पॅरा ऑलिम्पिक या क्रीडा प्रकारात ४०० मीटरमध्ये भारताला कोटा मिळवून देत क्वालिफाय केले. त्यामुळे दिलीप आणि प्रशिक्षक वैजनाथ काळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पंतप्रधानांनी केले कौतुकपॅरा एशियन गेमच्या शेवटच्या दिवशी दिलीपने सुवर्णपदकाला गवसणी घातल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील दिलीपची कामगिरीची दखल घेत दिलीपची पोस्ट ट्विटरवर शेअर करीत त्याचे अभिनंदन केले.ही बाब नाशिकसह देशासाठी अभिमानास्पद आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिक