शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

सिंहस्थासाठी नाशिक महापाालिका मोडणार २०० कोटींच्या ठेवी

By suyog.joshi | Updated: February 16, 2025 14:52 IST

महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी नाशिक महापालिकेचे अंदाजपत्रक सादर केले.

- सुयोग जोशीनाशिक : महापालिकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ६६.३० कोटी आरंभीच्या शिलकीसह ३०५४.७० कोटी रूपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला रविवारी (दि.१६) सादर केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत ५०० कोटी रूपयांची वाढ करण्यात आली आहे. दोन वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा होत असून पायाभूत सुविधा उभारण्यासाठी कर्ज उचलण्याऐवजी महापालिकेने दोनशे कोटींच्या ठेवी मोडण्याचा निर्णय घेतला आहे. कर्ज उचलल्यास व्याजापोटी दरवर्षी मोठी रक्कम अदा करावी लागेल. त्यामुळे कर्जाऐवजी ठेवी मोडल्या जातील. दरम्यान २०२५ - २६ अर्थसंकल्पात सिंहस्थ आराखडा व्यतिरिक्त कामांसाठी पाच कोटी रुपये टोकनची तरतूद करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी नाशिक महापालिकेचे अंदाजपत्रक सादर केले. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी दत्तात्रय पाथरूट, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर उपस्थित होते. कुंभमेळ्यासाठी शासन आराखड्यात मंजूर नसलेली कामे परंतु सिंहस्थाच्यादृष्टिने आवश्यक व पूरक असणाऱ्या कामासाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी विविध विभागांची विकास कामांसाठी १२५ कोटींच्या प्राकलनसाठी टोकन म्हणून पाच कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. सिंहस्थासाठीच पाणीयोजना करण्यासाठी ३२८.९० कोटींची तरतूद करण्यात आली.

शहराची वाढती लोकसंख्येचा विचार करता सद्यस्थितीतील गंगापूर धरण येथून असलेली मुख्य रॉ वॉटर पाईप लाइन पीएससी असून तिची क्षमता कमी होत आहे. पाणी गळती वाढत असल्याने नवीन पाईप लईन टाकण्याची गरज आहे. त्यामुळे पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अनुदानातून गंगापूर धरण ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत १८०० मीमी व्यासाची लोखंडी साहित्याची मुख्य गुरूत्ववाहिनी टाकण्याचा २१० कोटी रकमेचा प्रकल्प तयार करण्यात आला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक