शहरं
Join us  
Trending Stories
1
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
2
राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
3
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
4
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
5
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
6
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
7
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
8
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका
9
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
10
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
11
'या' गोष्टींमुळे सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, मनोज वाजपेयी यांचा मोठा खुलासा, म्हणाले....
12
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
13
रेस्टॉरंटमध्ये झाली नजरानजर अन्...; 4 महिने अमिराला डेट करणाऱ्या अब्दु रोजिकची लव्हस्टोरी
14
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
15
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
16
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
17
राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला
18
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
19
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
20
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल

नाशिक महापालिकेत नगसेवकांसह सामान्य नागरिकांना शस्त्रधारी सुरक्षारक्षकांचा जाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:21 PM

महापालिकेत नियुक्त करण्यात आलेल्या महाराष्टÑ सुरक्षा मंडळाच्या शस्त्रधारी सुरक्षारक्षकांचा जाच नगसेवकांसह सामान्य नागरिकांनाही वाढू लागल्याने त्याचे तीव्र पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. महापालिकेत कर्फ्यू लागला की काय, अशी स्थिती निर्माण झाल्याचा आरोप करत सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी सभापतींनी केवळ आयुक्तांच्याच दालनापुढे शस्त्रधारी सुरक्षारक्षक नेमावेत, असे आदेशित केले.

ठळक मुद्दे महापालिकेत कर्फ्यू लागला की काय शस्त्रधारी सुरक्षारक्षक तैनात सुरक्षारक्षकांना तातडीने हटविण्याची मागणी

नाशिक : महापालिकेत नियुक्त करण्यात आलेल्या महाराष्टÑ सुरक्षा मंडळाच्या शस्त्रधारी सुरक्षारक्षकांचा जाच नगसेवकांसह सामान्य नागरिकांनाही वाढू लागल्याने त्याचे तीव्र पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. महापालिकेत कर्फ्यू लागला की काय, अशी स्थिती निर्माण झाल्याचा आरोप करत सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी सभापतींनी केवळ आयुक्तांच्याच दालनापुढे शस्त्रधारी सुरक्षारक्षक नेमावेत, असे आदेशित केले.  महापालिका मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन परिसरात प्रशासनाने महाराष्टÑ सुरक्षा मंडळाचे शस्त्रधारी सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांत नगरसेवकांची अंगझडती घेण्यापासून ते आपल्या प्रश्नांसाठी दाद  मागण्याकरिता येणाºया सामान्य नागरिकांची अडवणूक केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. शुक्रवारी (दि. २४) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत त्याचे पडसाद उमटले. म्युनिसिपल कामगार सेनेचे अध्यक्ष व स्थायीचे सदस्य प्रवीण तिदमे यांनी सदर शस्त्रधारी सुरक्षारक्षकांच्या नेमणुकीस पुन्हा एकदा ठामपणे विरोध दर्शविला. स्थायी समितीने मुख्यालयात केवळ आयुक्तांच्या दालनापुढे दोन शस्त्रधारी सुरक्षारक्षक नियुक्तीचे आदेशित केले असताना २८ सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. सदर सुरक्षारक्षकांना तातडीने हटविण्याची मागणी तिदमे यांनी केली. सूर्यकांत लवटे यांनी महापालिकेला पोलिसी छावणीचे स्वरूप आल्याचे सांगत पोलीस दलात रिजेक्ट झालेल्या या सुरक्षारक्षकांच्या प्रशिक्षणाबद्दलही शंका उपस्थित केली. डी. जी. सूर्यवंशी यांनी महापालिकेत कर्फ्यू लागल्याची स्थिती निर्माण झाल्याचे सांगत स्थायीने केलेल्या ठरावाची अंमलबजावणी न झाल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले, महापालिकेत सहा गनधारी व ११ सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली असून, उर्वरित सुरक्षारक्षकांची नियुक्ती जलशुद्धीकरण केंद्रांवर करण्यात आल्याचे सांगितले. अतिरेकी कारवारांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. परंतु महापालिका हे सार्वजनिक ठिकाण असून, याठिकाणी रोज शेकडो नागरिक आपल्या समस्या घेऊन येत असतात.  यापूर्वी महापालिकेला अशा सुरक्षारक्षकांची कधीही गरज भासली नाही; मग आताच एवढी भीती का वाटते आहे, असा सवालही सदस्यांनी उपस्थित केला. सदर सुरक्षारक्षक तातडीने महापालिका मुख्यालयातून हलवावे, अशी मागणीही सदस्यांनी केली. स्थायीच्या ठरावाची अंमलबजावणी करा स्थायी समितीने सदर ठराव मंजूर करताना केवळ आयुक्तांच्याच दालनापुढे सुरक्षारक्षक तैनात असतील असे स्पष्ट केले होते; परंतु ठरावाची अंमलबजावणी न होता भलताच उद्योग सुरू असल्याचा आरोप प्रवीण तिदमे यांनी केला. त्यावर सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी स्थायी समितीने केलेल्या ठरावानुसारच अंमलबजावणी करण्याचे आदेशित केले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक