शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक मनपाच्या स्थायी समितीच्या वादाचा आता सोमवारी फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 15:32 IST

नाशिक- शासनाने स्थायी समिती सदस्य नियुक्त करण्यासाठी महासभेच्या ठरावाला दिलेली स्थगिती उठवावी यासाठी भाजपाने दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालय आता सोमवारी (दि. २) सुनावणी करणार आहे. त्यासाठी सर्व प्रतिवादींना हजर राहण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देउच्च न्यायालयात प्रकरणज्येष्ठ विधीज्ञ अणे बाजु मांडणार

नाशिक- शासनाने स्थायी समिती सदस्य नियुक्त करण्यासाठी महासभेच्या ठरावाला दिलेली स्थगिती उठवावी यासाठी भाजपाने दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालय आता सोमवारी (दि. २) सुनावणी करणार आहे. त्यासाठी सर्व प्रतिवादींना हजर राहण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

गुरूवारी (दि.२) भाजप गटनेते जगदीश पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर तातडीचे म्हणून शुक्रवारी (दि. २८) सुनावणी होणे अपेक्षीत होते परंतु ती होऊ शकली नाही. आता येत्या सोमवारी (दि. २) सुनावणी होणार आहे. त्यासाठी विभागीय आयुक्त, राज्य शासनाच्या नगरविकास खात्याचे अधिकारी, महापालिकेचे नगरसचिव, शिवसेना गटनेता विलास शिंदे यांना हजर राहण्यासाठी नोटिसा बजावण्यात येणार आहे, असे जगदीश पाटील यांनी सांगितले. न्या. काथावाला आणि छागला यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे. जगदीश पाटील यांच्या वतीने अ‍ॅड. प्रविण थोरात, जय भाटीया यांनी काम बघितले. त्यानंतर सोमवारी ज्येष्ठ विधीज्ञ श्रीहरी अणे हे बाजू मांडणार आहेत, असेही पाटील यांनी सांगितले.

स्थायी समितीचे ८ सदस्य शनिवारी (दि. २९) निवृत्त होत असून त्यांच्या जागी नुतन सदस्य निवडीसाठी गेल्या सोमवारी (दि.२४) सभा झाली. त्यात भाजपाचे चार, शिवसेनेचे दोन आणि कॉँग्रेस तसेच राष्टÑवादीचा एकेक सदस्य नियुक्त करण्यात आला आहे. मात्र, भाजपचे दोन नगरसेवक कमी झाल्याने पक्षीय तौलनिक बळ घटले आहे त्यामुळे एक सदस्य शिवसेनेचा वाढतो असा शिवसेनेचा दावा होता. त्यानुसार नियुक्ती करण्याचे आदेश नगरविकास खात्याने दिले होते. परंतु महापौरांनी सेनेचे दोन सदस्य नियुक्त केले त्यानंतर विभागीय आयुक्तांनी सभापतीपदाची निवड करण्यासाठी ३ मार्च ही तारीख घोषित केली. परंतु पक्षीय तौलनिक बळानुसार सदस्य नियुक्त झाले नसल्याचा आक्षेप शिवसेना गटनेता विलास शिंदे यांनी शासनाकडे घेतला. त्यानुसार राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने सदस्य नियुक्तीच्या महासभेच्या ठरावाला अंतिरीम स्थगिती दिली आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHigh Courtउच्च न्यायालय