शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिकेला ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पामार्फत मिळणार दरमहा एक लाख युनिट वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 15:41 IST

जर्मन सरकारचा उपक्रम : पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्या लोकार्पण

ठळक मुद्देप्रकल्प चालविण्याकरीता महापालिका संबंधित मक्तेदाराला दरमहा ५ लक्ष रुपये मोजणार आहेप्रकल्पासाठी जी.आय.झेड जर्मनी यांचे कडून नाशिक महानगरपालिकेस ६.८० कोटी रुपये इतके अनुदान प्राप्त झाले

नाशिक - जर्मन सरकार आणि भारत सरकार यांचे संयुक्त प्रयत्नातून नाशिक शहरामध्ये कचऱ्यापासून कार्यान्वित करण्यात आलेल्या ‘वेस्ट टू एनर्जी’ या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा बुधवारी (दि.२९) दुपारी १२ वाजता पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. या पथदर्शी प्रकल्पातून नाशिक महापालिकेला दरमहा १ लाख युनिट इतकी वीज पुढील दहा वर्षापर्यंत उपलब्ध होणार असून सदर प्रकल्प चालविण्याकरीता महापालिका संबंधित मक्तेदाराला दरमहा ५ लक्ष रुपये मोजणार आहे.जर्मन सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या  पर्यावरण सुधार कार्यक्रमांतर्गत सदर प्रकल्प राबविण्यात येत असून त्यासाठी जी.आय.झेड जर्मनी यांचे कडून तांत्रिक व आर्थिक सहकार्य करण्यात आले आहे. सदर प्रकल्पात दररोज सुमारे १५ ते २० मे. टन ओला कचरा व १० ते १५ मे.टन सार्वजनिक शौचालयातील मलजल अशा ३० मे.टन कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅस / मिथेन गॅस तयार करुन त्या द्वारे वीज निर्मिती करण्यात येणार आहे. ८ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी जी.आय.झेड जर्मनी यांचे कडून नाशिक महानगरपालिकेस ६.८० कोटी रुपये इतके अनुदान प्राप्त झाले असून प्रकल्प उभारणीसाठी लागणारा १.२२ कोटी रुपये खर्च कंपनी करीत आहे. प्रकल्प उभारणीसाठी नाशिक महानगरपालिकेची कोणतीही भांडवली गुंतवणुक नाही मात्र प्रकल्प उभारणी करिता सुमारे ६ हजार चौ.मीटर जागा मनपा खत प्रकल्पा शेजारी पुर्वीचे जकात मध्यवर्ती गोडावून जवळ मनपाने उपलब्ध करु न दिलेली आहे. या प्रकल्प उभारणीचे काम मे. विल्होळी वेस्ट मॅनेजमेंन्ट प्रा.लि.बंगलोर यांचे मार्फत करण्यात आले आहे. १० वर्ष कालावधी साठी संपूर्ण प्रकल्प चालविणे, देखभाल व दुरु स्ती करणेचे काम सदर कंपनी मार्फत करण्यात येणार आहे. तसेच प्रकल्पासाठी लागणारा ओला कचरा (हॉटेल वेस्ट व भाजीपाला वेस्ट) व मलजल वाहतूकीची जबाबदारी सुध्दा कंपनीची असणार आहे. संबंधित कंपनी वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातून वीज निर्मिती तयार होणाºया वीजेतून नाशिक महानगर पालिकेस दरमहा सुमारे एक लाख युनिट इतकी वीज पुरविणार आहे.इन्फोराज्याच्या पॉवर ग्रीडला जोडणीप्रकल्पात तयार झालेली वीज महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या पॉवर ग्रीडला जोडण्यात येणार असून जेवढी वीज पॉवर ग्रीड मध्ये टाकण्यात येईल तेवढे युनिट मनपास इतर वीज देयकातून सुट मिळणार आहे. याशिवाय, सदर वीजेचा वापर महापालिकेला खतप्रकल्पावर करता येणार असून त्यातून महापालिकेची बचत होणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका