शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

घरपट्टी थकबाकीदारांच्या मिळकतीचा नाशिक महापालिका घेणार कब्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 18:43 IST

नोटीसा बजावल्या : बोली न आल्यास करणार कार्यवाही

ठळक मुद्देजप्त मिळकती विक्रीसाठी लिलावात बोली न आल्यास स्थायी समितीच्या अधिकारात मिळकतींवर पालिकेच्या नावाने कब्जा करण्यात येणारयावर्षी महापालिकेने थकबाकीदारांविरूद्ध कठोर पावले उचलण्याचे ठरविले आहे

नाशिक - महापालिकेने घरपट्टी थकबाकीदारांविरूद्ध कठोर पाऊल उचलण्याचे ठरविले असून थकबाकीदाराने दिलेल्या मुदतीत भरणा न केल्यास मिळकत जप्त केली जाणार आहे. याशिवाय, जप्त मिळकती विक्रीसाठी लिलावात बोली न आल्यास स्थायी समितीच्या अधिकारात मिळकतींवर पालिकेच्या नावाने कब्जा करण्यात येणार असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.मार्च २०१८ अखेर घरपट्टी वसुलीसाठी महापालिकेकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. घरपट्टी विभागाने ९४ हजार थकबाकीदारांना सूचनापत्रे पाठविली असून भरणा करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी दिला आहे. संबंधिताने १५ दिवसात भरणा न केल्यास त्यास जप्तीची नोटीस बजावली जाणार आहे. अंतिम नोटीस बजावल्यानंतर २१ दिवसांच्या मुदतीत थकबाकीचा भरणा न केल्यास सदर मालमत्ता लिलावाद्वारे विक्रीस काढली जाणार आहे. ब-याचदा वादग्रस्त मिळकतींना लिलावात बोली येत नाही. अशा मिळकतींवर स्थायी समितीच्या अधिकारात महापालिकेचे नाव लावून १ रुपये बोली लावून त्यांचा कब्जा घेतला जातो. यासाठी विधी सल्लागारामार्फत माहिती मागविण्यात येत आहे. सदर लिलाव प्रक्रिया शक्य तितक्या लवकर राबविण्याचे नियोजन असल्याचेही दोरकुळकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, घरपट्टी थकबाकीदारांनी मालमत्ता जप्तीची कटू कारवाई टाळण्यासाठी थकबाकीचा भरणा करावा, असे आवाहनही दोरकुळकर यांनी केले आहे. मागील वर्षी घरपट्टी विभागामार्फत जप्त मिळकती सील करण्याची कारवाई केली होती. परंतु, त्यातून काही निष्पन्न होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे यावर्षी महापालिकेने थकबाकीदारांविरूद्ध कठोर पावले उचलण्याचे ठरविले आहे.सुमारे ३७ कोटी अपेक्षितमहापालिकेने ९४ हजार थकबाकीदार मिळकतधारकांना सूचनापत्रे पाठविली आहेत. या मिळकतधारकांच्या माध्यमातून महापालिकेला सुमारे ३७ कोटी रुपये वसुली अपेक्षित आहे. महापालिकेने यावर्षी १०५ कोटी रुपये घरपट्टी वसुलीचे उद्दिष्टय ठेवले असून आतापर्यंत सुमारे ७३ कोटी रुपये वसुली झाल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका