शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिकेच्या पोटनिवडणुकीत तिरंगी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 18:49 IST

प्रभाग १३ : तिघांची माघार, आठ उमेदवार रिंगणात

ठळक मुद्देमनसे, शिवसेना आणि भाजपा या तिघांमध्येच खरी लढतमनसेच्या उमेदवाराला कॉँग्रेस आणि राष्टवादीने पाठिंबा दर्शविला आहे

नाशिक - महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.२३) तिघांनी माघार घेतल्याने आठ उमेदवार नशिब अजमावणार आहेत. मात्र, मनसे, शिवसेना आणि भाजपा या तिघांमध्येच खरी लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान, भाजपाच्या पदाधिका-यांनी पक्षाच्याच उमेदवाराला माघार घेण्यासाठी दबाव टाकण्याचा केलेला प्रयत्न असफल ठरला आहे.प्रभाग क्रमांक १३ मधील पोटनिवडणुकीसाठी ११ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. शुक्रवारी (दि.२३) अर्ज मागे घेण्यासाठी मुदत होती. त्यात, भाजपाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या माजी नगरसेवक माधुरी मिलिंद जाधव, भाजपाच्याच तिकिटावर गेल्यावेळी लढलेल्या कीर्ती शुक्ल आणि मनसेच्या डमी उमेदवार रश्मी सचिन भोसले यांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे, निवडणूक रिंगणात मनसेच्या अ‍ॅड. वैशाली मनोज भोसले, शिवसेनेच्या स्नेहल संजय चव्हाण, भाजपाच्या विजया हरिष लोणारी यांचेसह अपक्ष उमेदवार ज्योती नागराज पाटील, समीना कयुम पठाण, अवंतिका किशोर घोडके, माजी नगरसेवक व राष्टवादीच्या बंडखोर उमेदवार रंजना ज्ञानेश्वर पवार आणि समीमा मकसूद खान यांच्यात लढत होणार आहे. दिवंगत नगरसेवक सुरेखा भोसले यांच्या कुटुंबीयांकडून सदर निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले गेले. परंतु,त्यात यश आले नाही. मनसेच्या उमेदवाराला कॉँग्रेस आणि राष्टवादीने पाठिंबा दर्शविला आहे. मनसेच्या उमेदवारासमोर शिवसेनेच्या स्नेहल चव्हाण यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. तर भाजपानेही उमेदवार दिल्याने ख-या अर्थाने तिरंगी सामना रंगणार आहे. शनिवारी (दि.२४) उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे. पोटनिवडणुकीसाठी एकूण ४७ हजार २२८ मतदार असून त्यात २४ हजार १४० पुरुष तर २३ हजार ८८ स्त्री मतदार आहेत. ४ एप्रिल पर्यंत प्रचारासाठी अवधी असल्याने उमेदवारांनी घरोघरी जाऊन संपर्क साधण्यास सुरुवातही केली आहे. दि. ६ एप्रिल रोजी मतदान होऊन ७ एप्रिलला गंगापूररोडवरील शिवसत्य मैदानात मतमोजणी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.भाजपा उमेदवारावर दबावमनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी भाजपातील काही पदाधिका-यांचा एक गट प्रयत्नरत होता. त्यानुसार, सकाळी भाजपाच्या वसंत स्मृती कार्यालयात शहराध्यक्षांसमवेत पदाधिका-यांची बैठक झाली. यावेळी, पक्षाच्या उमेदवार विजया लोणारी यांनी माघार घ्यावी, यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. परंतु, यापुर्वी दोन वेळा माघार घेण्यास भाग पाडल्याने लोणारी यांनी माघारीस स्पष्ट नकार दिला. त्यामुळे, पदाधिका-यांचा नाईलाज झाला. अखेर, डमी उमेदवार कीर्ती शुक्ल आणि माधुरी जाधव यांचेच अर्ज मागे घेण्यात आले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाElectionनिवडणूक