शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

कालीदास कलामंदिराच्या नियमावलीवर नाशिक महापालिकेचे माघारी नाट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 11:35 PM

नाशिक- कोणत्याही शहराची ओळख केवळ सिमेंटच्या जंगलामुळे होत नाही तर त्या ठिकाणी राहणाऱ्या समाज धुरीण, कलावंत आणि क्रीडापटूंमुळे होत असते असे म्हणतात, परंतु हे वाक्य इतके गुळगूळीत झाले आहे की नाशिक महापालिका ते मानण्यास तयार नाही. समाज मंदिरे, व्यायामशाळा इतकीच नाट्यगृहे देखील महत्वाची असतात हे बहुधा महापालिकेला मान्य नसावे, त्यामुळे व्यापारी संकुलातील गाळे भाड्याने द्यावे आणि त्यासाठी जी नियमावली लावावी तीच नियमावली लावण्यामुळेच बहुधा कलावंतासारख्या अभिजनातून नाराजीचा सूर उमटला आणि गेल्यावषी पर्यंत नियमावलीचे समर्थन करणाºया नाशिक महापालिकेला माघार नाट्य करावे लागले.

ठळक मुद्देमहापालिका प्रायव्हेट लिमीटेड कंपनी नव्हे सांस्कृतिक भूख ही अन्य गरजांइतकीच महत्वाची

संजय पाठक, नाशिक- कोणत्याही शहराची ओळख केवळ सिमेंटच्या जंगलामुळे होत नाही तर त्या ठिकाणी राहणाऱ्या समाज धुरीण, कलावंत आणि क्रीडापटूंमुळे होत असते असे म्हणतात, परंतु हे वाक्य इतके गुळगूळीत झाले आहे की नाशिक महापालिका ते मानण्यास तयार नाही. समाज मंदिरे, व्यायामशाळा इतकीच नाट्यगृहे देखील महत्वाची असतात हे बहुधा महापालिकेला मान्य नसावे, त्यामुळे व्यापारी संकुलातील गाळे भाड्याने द्यावे आणि त्यासाठी जी नियमावली लावावी तीच नियमावली लावण्यामुळेच बहुधा कलावंतासारख्या अभिजनातून नाराजीचा सूर उमटला आणि गेल्यावषी पर्यंत नियमावलीचे समर्थन करणा-या नाशिक महापालिकेला माघार नाट्य करावे लागले.कालिदास कलामंदिर हे महापालिकेचे नाट्यगृह तसे जूने. नाशिकच्या अनेक कलावतांनी कालिदास नाट्यगृहापासूनच प्रायोगिक नाटके करून व्यावसायिक नाटके, दुरचित्रवाणी मालिका आणि चित्रपटापर्यंत मजल मारली आहे. सांस्कृतिक भूख ही देखील अन्य गरजांइतकीच महत्वाची आहे. परंतु महापालिकेला यात व्यवसाय दिसू लागल्याने महापालिकेत संवेदनशीलता किंवा वैचारीकतेचा भाग आहे किंवा नाही असा प्रश्न पडला. मुळात नाट्यमंदिराची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत गेली आणि नाशिकमधीलच नव्हे प्रशांत दामले, भरत जाधव यांच्या सारख्या नाट्य अभिनेत्यांनी महापालिकेची इभ्रतच चव्हाट्यावर मांडली तेव्हा कुठे सुधारणा करण्यास प्रारंभ झाला. त्यानंतर कुठे तरी स्मार्ट सिटी अंतर्गत कलामंदिरचे काम पुढे गेले तेही कलावंताना विश्वासात न घेता!आता कालीदास कला मंदिराचे नुतनीकरण तब्बल ९ कोटी रूपये खर्च करून पुर्ण झाल्यानंतर आता नुतनीकरणाचे निमित्त करूनच हीच भाडेवाढीची संधी आहे. असे समजून अवास्तव वाढ करण्यात आली. तीचे कवित्व संपत नाही तोच नियमावलीचा जाच पुढे आला. एखादे नाटक रद्द झाले तर भाडे आणि अनामत जप्त हे गेल्या वर्षभरापासून सारे नाट्य व्यवसायिक सहन करत आहेत. मुळात भाडे वेगळे आणि अनामत रक्कम वेगळी. साहित्याचा वापर करताना कोणतीही तुटफूट झालीच तर त्याची वसुली करता यावी यासाठी अनामत रक्कम आकारली जाते. परंतु नाट्य प्रयोग रद्द केला तर भाडे आणि अनामत जप्त असा तुघलगी प्रकार होता. गंमतीचा भाग म्हणजे नियमावलती एका ठिकाणी महापालिकेने पंधरा दिवस नाटक रद्द केले तर किती भाडे घेतले जाईल वगैरे कोष्टक दिले असून दुसरीकडे एका कलमात भाडे आणि अनामत रक्कम जप्त करण्यात येईल असे नमुद केले आहे. बरे तर नाटक महापालिकेच्या कामामुळे किंवा अन्य व्हीआयपीच्या कार्यक्रमामुळे प्रशासन रद्द करू शकते, मग त्याच्या भरपाईचे काय याचा कोठेही उल्लेख नाही. अशा अनेक विसंगती असतानाही त्याबाबत मात्र कोणाचे ऐकून न घेता हीच नियमावली वर्षभरापासून पुढे रेटली जात आहे. लोकमतने याबाबत आवाज उठवलाच परंतु अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी आपल्या स्वानुभवारून देखील महापालिकेची लक्तरे राज्यभरात वेशीवर टांगली मग कुठे प्रशासनाला जाग आली आणि काही तरी बदल करण्याची तयारी चालवली आहे.कालिदास कलामंदिर काय किंवा समाज मंदिरे आणि व्यायामशाळा काय, महापालिका सर्वच ठिकाणी उत्पन्नाचे साधन शोधत आहे. महापालिका ही पालक संस्था आहे. प्रायव्हेट लिमीटेड कंपनी नव्हे , हे कारभाऱ्यांना कधी कळणार की प्रत्येकवेळी कोणाला तरी कान टोचावे लागणार हा खरा प्रश्न आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाPrashant Damleप्रशांत दामले