शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिकेतील नगरसेवकांचा ‘धावपळ’वार, मुंढेंचा घेतला धसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 19:11 IST

मुख्यालयात गर्दी : फाईलींवर स्वाक्षरीसाठी पायधूळ

ठळक मुद्देतुकाराम मुंढे हे शुक्रवारी (दि.९) सकाळी ११ वाजेच्या सुमारास आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत नवीन आयुक्त आल्यास प्रलंबित फाईलींचा प्रवास पुन्हा लांबण्याची भीती

नाशिक - महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे हे शुक्रवारी (दि.९) पदाची सूत्रे हाती घेणार असल्याने गुरुवारी (दि.८) दिवसभर पदाधिका-यांसह नगरसेवकांची प्रलंबित फायलींवर मावळते आयुक्त अभिषेक कृष्ण यांची स्वाक्षरी घेण्यासाठी धावपळ दिसून आली. मात्र, आयुक्तांनी स्वाक्ष-या करण्याचे टाळल्याचे सांगितले जाते. त्यामुळे, अनेकांना चिंताक्रांत चेह-यांनी मुख्यालयातून माघारी परतावे लागल्याची चर्चा आहे.महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांची मुंबई एमआयडीसी येथे सह मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झालेली आहे तर त्यांच्या जागेवर बदलून आलेले पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे हे शुक्रवारी (दि.९) सकाळी ११ वाजेच्या सुमारास आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. त्यामुळे, मावळते आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी गुरुवारी (दि.८) नेहमीप्रमाणे महापालिका मुख्यालयात येत आपल्या नियोजित कामांवर भर दिला. यावेळी, सत्ताधा-यांसह विरोधी पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक तसेच अधिकारी यांचेसह विविध क्षेत्रातील नागरिकांनीही आयुक्तांची भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. एकीकडे आयुक्तांची भेट घेण्याचे सत्र पार पडत असतानाच आयुक्तांकडे प्रलंबित असलेल्या फाईलींवर स्वाक्ष-या होण्यासाठी अनेक नगरसेवकांची धावपळ सुरू होती. काही नगरसेवक खातेप्रमुखांसह अतिरिक्त आयुक्तांकडे चकरा मारत प्रलंबित फाईलींचा निपटरा करण्यासाठी आग्रह धरताना दिसून येत होते. नवीन आयुक्त आल्यास प्रलंबित फाईलींचा प्रवास पुन्हा लांबण्याची भीती असल्याने बव्हंशी नगरसेवकांनी मुख्यालयात गुरुवारी हजेरी लावली. परंतु, आयुक्तांनी ब-याच फाईलींवर स्वाक्ष-या केल्या नसल्याचे समजते. त्यामुळे, संबंधित नगरसेवकांच्या पोटात गोळा उठला आहे. नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून कामांची पुनर्तपासणी शक्य असल्याने फाईलींचा प्रवास लांबण्याची शंका व्यक्त केली जात आहे.नगरसेवकांची अडचणआयुक्त अभिषेक कृष्ण यांची मुंबई एमआयडीसीमध्ये सह मुख्य कार्यकारी अधिकारी या महत्वाच्या पदावर नियुक्ती झालेली आहे. त्यांच्याकडे विदर्भातील एमआयडीसी विभागासह आयटीपार्क, वाईनपार्क या प्रकल्पांची सूत्रे देण्यात आलेली आहेत. वास्तविक कृष्ण यांची मोठ्या पदावर बदली झालेली आहे. गुरुवारी आयुक्तांना भेटण्यासाठी पदाधिका-यांसह नगरसेवकांनी गर्दी केली होती. परंतु, आयुक्तांच्या दालनात जाऊन केवळ त्यांच्याप्रती सहानुभूती दाखविण्यापलिकडे भाव व्यक्त करता येत नव्हता आणि मोठ्या पदावर बदली झाली म्हणून त्यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छाही देता येत नव्हत्या.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे