शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिकेची ३० सुलभ शौचालये चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 01:33 IST

शहरात एकूण चारशे सुलभ शौचालये, त्यातील १५३ शौचालये सुलभ संस्थेला दिलेली. महापालिकेने शोध घेतला तेव्हा कंत्राटानुसार १५३ पैकी १२३ शौचालये आढळले आहेत. तीस शौचालय बेपत्ता झाली असून, त्याचा शोध महापलिका घेत आहेत.

नाशिक : शहरात एकूण चारशे सुलभ शौचालये, त्यातील १५३ शौचालये सुलभ संस्थेला दिलेली. महापालिकेने शोध घेतला तेव्हा कंत्राटानुसार १५३ पैकी १२३ शौचालये आढळले आहेत. तीस शौचालय बेपत्ता झाली असून, त्याचा शोध महापलिका घेत आहेत.  तथापि, महापालिकेच्या आरोग्य विभागाने या शौचालयांचा शोध घेतानाच सुलभ कंपनीला दंडासहीत भरपाईची नोटीस आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशान्वये बजावली आहे.  राज्यात कोणत्याही महापालिकेत वेगवेगळे घोटाळे उघडीस येतात मात्र नाशिक महापािलकेत कचरा, मलजलनिस्सारण यासारख्या ठेक्यांमध्येही गैरव्यवहार झाल्याची उदाहरणे आहेत आता तर शौचालय घोटाळा झाला असून, या घोटाळ्यामुळे अशा ठेकेदारांना पोसरणाऱ्या राजकीय नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक शहरातील सार्वजनिक शौचालयांचा विषय गाजत होता. शहरात सार्वजनिक शौचालये आणि प्रसाधनगृह अपुरी असल्याने नाशिक शहरात नवीन शौचालये बांधण्याची मागणी होत होती. नवीन सुमारे दोनशे शौचालय बांधण्याचे काम प्रलंबित होते. त्यामुळे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार आरोग्य विभागाने शोध मोहीम घेतली तेव्हा शहरात अनेक शौचालये अगोदरच पीपीपी तत्त्वावर सुलभ या संस्थेशी करार करून त्यांना शौचालये चालविण्यास दिल्याचे आढळले. त्यामुळे त्याचाही शोध घेतला असता १९९२ पासून आत्तापर्यंत लहान-मोठी १५३ शौचालये या कंपनीला महापालिकेने करार करून चालविण्यास दिल्याचे आढळले. ही शौचालये कोठे आहेत याचा अनेक अधिकाºयांनाही पत्ता नाही. त्यामुळे ठेकेदारालाच ही शौचालये दाखवण्यास सांगण्यात आले. त्यावेळी संबंधित ठेकेदार १५३ पैकी १२३ शौचालयेच दाखवू शकली उर्वरित तीस शौचालये तेदाखवू शकले नाहीत. मोठ्या प्रमाणात प्रयत्न करूनही संबंधित ठेकेदार हे सुलभ शौचालये दाखवू शकले नसल्याने आता या कंपनीला महापालिकेने दंडासह रक्कम भरण्याची  नोटीस बजावली आहे. महापालिकेत सुलभ कंपनीला काम देण्यासाठी मोड्यूल तयार करून देणाºयाएका ज्येष्ठ नगरसेवकाचा यात सहभाग असल्याची चर्चा आहे.  कंपनीचे कंत्राट अडचणीत आल्याचे दिसल्यानंतर संबंधितांनी आता मोठ्या प्रमाणात सारवासारवीचे चित्र सुरू केल्याचे वृत्त आहे.  तथापि, महपालिकेत अनेक चमत्कार घडत असतात, आता तर चक्क  तीस शौचालये गायब झाल्याने खळबळ उडाली आहे.शौचालयांना ’जीओ टॅग’महापालिकेची चक्क शौचालये चोरीस गेल्याचा प्रकार आढळल्याने नवीन दीडशे शौचालये बांधताना जीओ टॅगिंग करण्यात आले आहे. त्यामुळे किमान शौचालये दिसू लागली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtheftचोरी