शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
2
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
3
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
4
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
5
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
6
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
7
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
8
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
9
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
10
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
11
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
12
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळे विराटचे लाड?
13
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
14
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
15
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
16
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
17
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
18
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
19
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
20
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO

नाशिक महापालिका करणार ९६ कंत्राटी डाॅक्टरांची भरती

By suyog.joshi | Updated: October 17, 2023 12:59 IST

महापालिकेकडून तुटपुंजा मोबदला दिला जात असल्याने डाॅक्टर मनपाच्या रुग्णालयात सेवा देण्यास नकार देतात.

नाशिक: महापालिका आरोग्य विभागातर्फे सहाही विभागांतील रुग्णालयात एकूण विविध संवर्गांतील ९६ डाॅक्टरांची कंत्राटी पद्धतीने भरती करणार असून, लवकरच त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करणार आहे. परंतु, या अगोदर अनेकदा जाहिरात प्रसिद्ध करूनही डाॅक्टर या भरतीकडे पाठ फिरवतात, असा अनुभव आहे. महापालिकेकडून तुटपुंजा मोबदला दिला जात असल्याने डाॅक्टर मनपाच्या रुग्णालयात सेवा देण्यास नकार देतात.

शहरात महानगरपालिकेचे पाच मोठी रुग्णालये असून, त्यात बिटको, डॉ. झाकिर हुसेन, इंदिरा गांधी रुग्णालय, श्रीस्वामी समर्थ रुग्णालय व तपाेवन यांचा समावेश आहे. या ठिकाणी उपचारासाठी नेहमी गर्दी असते. आरोग्य विभागात एकूण ९३३ पदे मंजूर असून, त्यापैकी तब्बल ४६३ पदे रिक्त आहेत. अवघ्या ४७० मनुष्यबळावर रुग्णालयाचे काम सुरू असून अतिरिक्त ताणामुळे सेवेवर परिणाम होत आहे. महापालिकेकडून तांत्रिक, आरोग्य व वैद्यकीय अशी ७०६ पदांची भरती केली जाणार होती. पण ‘अ’ संवर्गातील पदभरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होते. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची ८२ पदे वगळता आरोग्याची इतर पदे भरली जाणार आहेत.

पण, त्यासदेखील नवीन वर्ष उजाडण्याची चिन्हे आहेत. पण, सध्या अपुऱ्या मनुष्यबळावरच गाडा हाकताना मनपा आरोग्य विभागाची दमछाक होत आहे. त्यांनी सहा महिन्यांसाठी विविध संवर्गांतील ९६ डाॅक्टरांची पदे तातडीने भरण्याचा निर्णय घेतला असून हा प्रस्ताव तातडीने आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. त्यांच्या वेतनावर सहा महिन्यांसाठी अडीच कोटी खर्च येणार असून, लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.या पदांसाठी होणार भरती

शल्यचिकित्सक- २, वैद्यकीयशास्त्र तज्ज्ञ- ४, स्त्रीरोगतज्ज्ञ- ५, क्ष-किरणतज्ज्ञ - २, बधिरीकरणतज्ज्ञ- २, नाक-कान-घसातज्ज्ञ- २, मानसोपचारतज्ज्ञ- १, दंत शल्यचिकित्सक- ३, वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस)- १०, वैद्यकीय अधिकारी- २० (बीएएमएस), जीएनएम- १०, एएनएम- १०.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिकdocterडॉक्टर