शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी नाशिक  मनपा सज्ज : डॉ. बापूसाहेब नागरगोजे 

By संजय पाठक | Updated: November 19, 2020 23:18 IST

नाशिक- कोरोनाची संभाव्य दुसरी लाट दिवाळीनंतर येणार असल्याचे सांगितले जात आहे. जागतिक तज्ज्ञांच्या या माहितीमुळे नाशिक महापालिकेने वैद्यकीय व्यवस्था पूर्णत: सज्ज ठेवली आहे. ७०० कर्मचाऱ्यांना मुदतवाढ दिली असून, दहा हजार अँटिजेन टेस्ट किट्स मागविल्या आहेत. शिवाय खासगी रुग्णालयातील कोरोनाबाधितांच्या खाटा सुरक्षित ठेवल्या आहेत, अशी माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी लोकमतशी बोलताना दिली.

ठळक मुद्देकोविड खाटा आरक्षितचदहा हजार किट्स मागविलेकर्मचाऱ्यांना मुदतवाढ

नाशिक- कोरोनाची संभाव्य दुसरी लाट दिवाळीनंतर येणार असल्याचे सांगितले जात आहे. जागतिक तज्ज्ञांच्या या माहितीमुळे नाशिक महापालिकेने वैद्यकीय व्यवस्था पूर्णत: सज्ज ठेवली आहे. ७०० कर्मचाऱ्यांना मुदतवाढ दिली असून, दहा हजार अँटिजेन टेस्ट किट्स मागविल्या आहेत. शिवाय खासगी रुग्णालयातील कोरोनाबाधितांच्या खाटा सुरक्षित ठेवल्या आहेत, अशी माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी लोकमतशी बोलताना दिली.

नाशिकमध्ये सध्या कोरोना बाधितांची संख्या मर्यादित असून, मृत्युदरदेखील घटला आहे. मात्र अशा स्थितीत दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेने प्रभावी यंत्रणा उभारली आहे. त्याबाबत डॉ. नागरगोजे यांच्याशी साधलेला संवाद..प्रश्न- कोराेनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याबाबत महापालिकेने काय तयारी केली आहे?डॉ. नागरगोजे- कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते काय याबाबत शासन स्तरावर दोन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये चर्चा झाली. त्यानुसार शासनाने महापालिकांना त्यांच्या स्तरावर तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्याला अनुसरून महापालिकेने कंत्राटी स्वरूपात घेतलेलेल्या सुमारे ७०० कर्मचाऱ्यांना गेल्याच महिन्यात तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्याच प्रमाणे दहा हजार अँटिजेन टेस्ट किट्स मागविल्या आहेत.प्रश्न- कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णालयांची अडचण भासली होती?डॉ. नागरगोजे- होय, त्या अनुषंगानेच नाशिक महापालिकेने सज्जता ठेवली आहे. खासगी रुग्णालयात महापालिकेच्या माध्यमातून जाणाऱ्या कोरोनाबाधितांसाठी आरक्षित खाटा कायम ठेवल्या आहेत. नाशिक महापालिकेचे डॉ. झाकीर हुसेन, बिटको आणि न्यू बिटको ही रुग्णालये कायम आहेतच तेथे ऑक्सिजन टँक बसविण्याचे कामदेखील सुरू आहे. याशिवाय कोविड केअर सेंटर ‘जैसे थे’ ठेवण्यात आली आहेत.प्रश्न- ही लाट थोपवण्यासाठी आणखी काय उपाय आहेत?डॉ. नागरगोजे- मुळात नागरिकांनी आरोग्य नियमांचे पालन करण्याची गरज आहे. आता सण असो वा अन्य काही बाहेर गर्दी टाळावी तसेच मास्क, हँड सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतराचे पालन केले पाहिजे. यानंतरही कोरोना संसर्ग झालाच तर महापालिका आहेच, परंतु मुळातच अशी वेळ येऊ नये यासाठी सर्वांनीच आरोग्य नियमांचे पालन केलेे पाहिजे.मुलाखत- संजय पाठक

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या