शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

नाशिक महापालिकेने थकबाकीदारांकडे वळविला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 14:32 IST

१६४ कोटी रुपये घरपट्टी थकीत : मिळकती काढणार थेट लिलावात

ठळक मुद्दे ९४ हजार थकबाकीदारांना सूचनापत्रे पाठविण्यात आली असून अंतिम नोटीसा बजावल्यानंतर लिलावाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत

नाशिक - वर्षानुवर्षापासून घरपट्टी थकविणा-या मिळकतधारकांच्या घरी आता मागायला जायचे नाही, तर कायदेशीर मार्गाने मिळकती जप्त करुन त्या थेट लिलावात काढण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी करवसुली विभागाला दिले आहेत. त्यानुसार, १६४ कोटी रुपयांची घरपट्टी वसूल करण्यासाठी ९४ हजार थकबाकीदारांना सूचनापत्रे पाठविण्यात आली असून अंतिम नोटीसा बजावल्यानंतर लिलावाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.महापालिकेने सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी घरपट्टी वसुलीचे ११० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत महापालिकेने ७८ कोटी रुपयांची घरपट्टी वसुल केलेली आहे तर येत्या महिनाभरात आणखी २५ ते ३० कोटी रुपये वसुली अपेक्षित आहे. १६४ कोटी रुपयांची घरपट्टी थकित असून वर्षानुवर्षापासून थकबाकी न भरणा-या मिळकतधारकांना महापालिकेकडून दरवर्षी नोटीसा बजावल्या जातात परंतु, मोजक्या मिळकतधारकांवर कारवाईचा बडगा उगारला जाऊन पुढे प्रक्रिया थांबवली जाते. तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. अनावश्यक कामांना कात्री लावून स्पीलओव्हर कमी करण्याचे काम सुरू आहे. महापालिकेत सर्वात जास्त उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून घरपट्टी वसुलीकडे बघितले जाते. परंतु, वर्षानुवर्षापासून थकबाकी न भरणा-यांची संख्या प्रचंड असल्याने प्रशासनाने आता त्यांच्याकडे आपला मोर्चा वळविला आहे. त्यानुसार, महापालिकेने ९४ हजार थकबाकीदारांना सूचनापत्रे पाठविली असून त्यांना अंतिम नोटीसा पाठवल्यानंतर मिळकती जप्त करुन त्यांचा थेट लिलाव करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात गेल्या तीन-चार दिवसांपासून घरपट्टी विभागाकडून कायदेशीर बाबी तपासून पाहिल्या जात असून ज्याठिकाणी न्यायालयाची स्थगिती नाही, अशा थकबाकीदारांवर तातडीने कारवाईची पाऊले उचलली जाणार आहेत. १६४ कोटी रुपयांच्या थकबाकीमध्ये सुमारे ८० कोटी रुपयांची रक्कम ही २ टक्के शास्ती आणि वॉरंट फी आहे.

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे