शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिका वाटणार ३ लाख जंतुनाशक गोळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 16:48 IST

जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात १ ते १४ वयोगटातील जवळपास ६८ टक्के म्हणजे २४१ दशलक्ष मुले असून, त्यातील २८ टक्के मुलांना आतड्यांमध्ये वाढणारे परजीवी जंतापासून धोका होवू शकतो. जंताक्षयाचे प्रमुख कारण म्हणजे वैयक्तीक व परिसर स्वच्छतेचा अभाव असला

ठळक मुद्देविद्यार्थी लाभार्थी : बौद्धीक, शारिरीक वाढ भारतात ५ वर्षाखालील मुला-मुलींमध्ये ७० टक्के रक्तक्षयाचे प्रमाण

नाशिक : एक ते १९ वयोगटातील विद्यार्थी व किशोरवयीन मुलांच्या बौध्दीक व शारिरीक वाढीसाठी नाशिक महापालिकेच्यावतीने राष्टÑीय जंतनाशक आरोग्य दिनानिमित्त सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांना जंतुनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळा व महाविद्यालयीन युवकांचा समावेश करण्यात आला आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात १ ते १४ वयोगटातील जवळपास ६८ टक्के म्हणजे २४१ दशलक्ष मुले असून, त्यातील २८ टक्के मुलांना आतड्यांमध्ये वाढणारे परजीवी जंतापासून धोका होवू शकतो. जंताक्षयाचे प्रमुख कारण म्हणजे वैयक्तीक व परिसर स्वच्छतेचा अभाव असला अथवा दुषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे सहजतेने होतो. बालकांमध्ये होणाऱ्या दिर्घकालीन कृमीदोष हा व्यापक आणि मुलांना कमजोर करणारा असून, त्यातून बौद्धीक व शारिरीक वाढ खुंटण्याची शक्यता असते. भारतात ५ वर्षाखालील मुला-मुलींमध्ये ७० टक्के रक्तक्षयाचे प्रमाण आढळते, महाराष्टÑात हेच पमाण ३४ टक्के असून, १५ ते १९ वर्षे वयोगटातील ५६ टक्के किशोरवयीन मुलींमध्ये व ३० टक्के किशोरवयीन मुलांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण आढळते. त्यामुळे राष्टÑीय जंतनाशक दिनानिमित्त सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्रस्तरावर जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत.नाशिक महापालिका क्षेत्रातील सर्व शासकीय शाळा, शासकीय अनुदानित शाळा, आश्रमशाळा, सर्व खासगी, अनुदानित शाळा, आर्र्मी स्कूल, सीबीएससीशाळा, सर्व खासगी इंग्रजी माध्यमिक शाळा, सुधारगृहे, मदरसे, मिशनरी स्कूल, गुरूकूल, संस्कार केंद्रे, सर्व अंगणवाडी, कनिष्ठ महाविद्यालयातील सुमारे ३ लाख ७ हजार २३३ विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.

टॅग्स :Medicalवैद्यकीयNashikनाशिक