शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

नाशिक महापालिकेला  १८ दिवसात मिळाले तीन कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 18:37 IST

नाशिक- कोरोना संकटाचा महापालिकेला मोठा आर्थिक फटका बसला असून यंदा घरपट्टीचे उद्दीष्ट घटूनही ते पुर्ण होेण्याची शक्यता कमीच आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने लागु केलेल्या अभय येाजनेला चांगलाप्रतिसाद मिळाल असून १ ते १८ नोव्हेंबर या अवघ्या १८ दिवसातच ३ कोटी १ लाख रूपयांची थकबाकी वसुल झाली आहे. 

ठळक मुद्देअभय येाजना फळाला मनपाला दिलासा उद्दीष्टपूर्ती मात्र कठीण

  नाशिक- कोरोना संकटाचा महापालिकेला मोठा आर्थिक फटका बसला असून यंदा घरपट्टीचे उद्दीष्ट घटूनही ते पुर्ण होेण्याची शक्यता कमीच आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने लागु केलेल्या अभय येाजनेला चांगलाप्रतिसाद मिळाल असून १ ते १८ नोव्हेंबर या अवघ्या १८ दिवसातच ३ कोटी १ लाख रूपयांची थकबाकी वसुल झाली आहे.

महापालिकेने गेल्यावर्षी १ एप्रिल १९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत १४१ कोटी रूपये वसुल करण्यात आले होते. त्यामुळे १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत १७० कोटी रूपयांचे घरपट्टी वसुलीचे उद्दीष्ट अंदाजपत्रकात देण्यात आले आहे. परंतु २३ मार्च पासून कोरोनाच्या महामारीमुळे महापालिकेच्या वसुलीवर प्रतिकुल परीणाम झाला. त्यातच दुकाने, कारखाने आणि खासगी कार्यालयात अनेकांचे वेतन निम्म्यावर आले आणि काहींच्या तर नोकऱ्या गेल्या. छोट्या विक्रेत्यांचे तर व्यवहार ठप्प झाले. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी कर वसुली कठोर पध्दतीने वसुल न करता किंवा अधिक भुर्दंड न लादता आधी ऑनलाईन घरपट्टी वसुलीची मुदत वाढवली आणि आता तर १ नोव्हेंबर पासून थकबाकी वसुलीसाठी अभय योजना जाहिर करण्यात आली आहे. त्यानुसार १ नोव्हेंबर ते १५ जानेवारी पर्यंत थकीत घरपट्टी भरणाऱ्यांना शास्तीत (दंड) ७५ टक्के सुट देण्यात येणार आहे. तर १६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी पर्यंत थकबाकी भरल्यास शास्तीत ५० ट्क्के आणि १६ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी पर्यंत थकबाकी भरल्यास २५ टक्के सुट दंडाच्या रकमेत मिळणार आहे. 

योजनेला सुरूवात झाल्यानंतर दिवाळी कालावधी असतानाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यानुसार १८ दिवसातच ३ केाटी  १ लाख रूपये वसुल झाले आहेत. त्यामुळे आता २८ फेब्रुवारी पर्यंत थकबाकी चांगलीच वसुल हेाण्याची शक्यता आहे, असे उपआयुक्त (कर संकलन) प्रदीप चौधरी यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTaxकर