शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडून झाडाझडती : 'बड्या' नेत्यांना पत्र देणारा तो 'शिलेदार' कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 14:36 IST

Nashik Municipal Corporation Election 2026 : परस्पर फॉर्म वाटपाची 'उलटतपासणी'

नाशिक : गेल्या आठवड्यात विल्होळी येथे फार्म हाउसवर रंगलेल्या एबी फॉर्म नाट्याची दखल भाजपच्या राज्य आणि केंद्रीय नेतृत्वाने अत्यंत गांभीर्याने घेतली आहे. नाशिकला आलेल्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या काही जणांकडून फॉर्म वाटप कुठून कसे झाले याची उलट तपासणी सुरू केली. बड्या नेत्यांना फॉर्म कोणत्या शिलेदाराने आणि कोणाच्या सांगण्यावरून दिले याचीदेखील त्यांनी माहिती घेतल्याचे वृत्त आहे. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच पक्षात अशाप्रकारची नामुष्की आल्याने अत्यंत दुरगामी परिणाम होतील अशाप्रकारच्या कारवाईचे संकेत त्यांनी दिले आहेत. गेल्या आठवड्यात भाजप उमेदवारांचे एबी फॉर्म देण्यावरून मोठा गदारोळ झाला होता. विल्होळी येथील फॉर्म हाउसवर एबी फॉर्मवरून झटापट झाली तसेच आमदार सीमा हिरे यांनी एका मोटारीचा पाठलाग करून फॉर्म ताब्यात घेतले होते. पक्षाचे एबी फॉर्म अगोदर काहींना मिळाले, त्या प्रभागातील उमेदवार नंतर घोषित झाले. ज्यांना उमेदवारी घोषितच झालेली नव्हती. त्यांना एबी फॉर्म अगोदर मिळाले आणि ज्यांना उमेदवारी अधिकृतरीत्या घोषित झाली. त्यांना विलंबाने उमेदवारी अर्ज मिळाल्याने त्यांना अधिकृत उमेदवारी मिळाली नाही. या सर्व प्रकरणानंतर रविवारी (दि. ४) नाशिकला आलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. 

पक्षाच्या अधिकृत उमेदवारीचे एबी फॉर्म फार्म हाउसवरून का वाटले? पक्ष कार्यालयात इच्छुकाला बोलावून त्याची स्वाक्षरी घेऊन एबी फॉर्म देण्याची पद्धत असताना हा प्रकार कसा घडला, असा प्रश्न उपस्थित करीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नाशिक भेटीत आमदारांसह पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. याबाबत सविस्तर माहिती घेत, ते रवाना झाले असले तरी निवडणुकीनंतर हे प्रकरण तापणार असल्याची चिन्हे आहेत. या प्रकरणी सीमा हिरे यांना पाचारण करण्यात आले होते. त्यांनी सर्व घटनाक्रम सांगितल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नाशिक भेटीत कोअर कमिटीसह आमदार आणि प्रतिनिधींशी चर्चा केली.

रवींद्र चव्हाण यांची आमदार हिरेंशी चर्चा

नाशिकमध्ये रविवारी (दि. ४) रवींद्र चव्हाण यांचे आगमन झाल्यानंतर दोन तास त्यांनी आमदार सीमा हिरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. एबी फॉर्म वाटप प्रकरणात झालेल्या घटनेबाबत त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली. त्यामुळे आता चव्हाण वरिष्ठ नेतृत्वाकडे काय अहवाल देतात त्याची उत्सुकता आहे.

मनपा निवडणुकीनंतर संबंधितांना नोटिसा ?

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नाशिक दौऱ्यावर आल्यानंतर एबी फॉर्म प्रकरणाची माहिती घेताना प्रामुख्याने उलट्या पद्धतीने तपासणी सुरू केली. संबंधित आता अधिकृत परंतु तेव्हा अनधिकृत असलेल्यांना एबी फॉर्म कोणी दिले. यात कोणा व्यावसायिकाचा संबंध आहे. अशाप्रकारे उलट पद्धतीने चौकशी सुरू केली. त्यानुसार शहराध्यक्ष आणि आमदारांना त्यांनी अहवाल देण्यास सांगितले आहे. त्यांनी तो दिल्याचे वृत्त आहे. महापालिका निवडणूक संपल्यानंतर काहींना नोटीसदेखील बजावण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे संबंधितांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Nashik Municipal Corporation Electionनाशिक महानगरपालिका निवडणूक २०२६