शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिकेला ‘कोणी डॉक्टर देता का डॉक्टर?’

By suyog.joshi | Updated: January 25, 2024 11:04 IST

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत मंजुरी मिळालेल्या १०५ आरोग्यवर्धिनी केंद्रांपैकी केवळ एकाचेच काम पूर्ण झाले आहे.

नाशिक : केंद्र शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या सहकार्यातून महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने शहरात उभारण्यात येणाऱ्या १०५ आरोग्य वर्धिनी केंद्रांसाठी ‘कोणी डॉक्टर देता का डॉक्टर‘ अशी स्थिती निर्माण झाली आहे. १०५ एमबीबीएस डॉक्टरांसाठी काढण्यात आलेल्या जागांसाठी केवळ सहाच जण मुलाखतीसाठी आल्याने आरोग्य विभागाच्यापुढे डॉक्टर भरतीचे नवे संकट उभे राहिले आहे.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत मंजुरी मिळालेल्या १०५ आरोग्यवर्धिनी केंद्रांपैकी केवळ एकाचेच काम पूर्ण झाले आहे. मात्र सद्यस्थितीत आरोग्य विभागाकडून २० आरोग्यवर्धिनींचे काम पूर्ण झाले असून २० ठिकाणचे काम सुरू आहे. एका केंद्रासाठी एक एमबीबीएस डॉक्टर, एक स्टाफ नर्स, एक बहुउद्देशीय कर्मचारी, एक शिपाई, एक सिकयुरिटी अशी आवश्यकता असते.

मात्र कर्मचारी नसल्याने आरोग्यवर्धिनी कधी सुरू होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही कामे जसजशी जागा मिळेल तसतशी पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. मनपाच्या सेवेतील आरोग्य विभागात सन २००८ नंतर शासकीय भरती झालेली नाही.

आरोग्य विभागापुढे पेचकेंद्र शासनाच्या मागदर्शनानुसार नाशिक महापालिकेने शहरात १०५ ठिकाणी आरोग्यवर्धिनी आरोग्य केंद्रे उभारण्याची तयारी केली आहे. सर्व केंद्रे एकाच रंगसंगतीमध्ये उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी केंद्र सरकार १५ व्या वित्त आयोगामधून मनपाला ६५ कोटी ५० लाखांचा निधी उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे भविष्यात आरोग्यवर्धिनीमधून नाशिककरांना आरोग्य सेवा मिळणार आहे. देशातील जनतेचे जीवनमान उंचाविण्यासाठी, तसेच त्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी केंद्र सरकार विविध उपाययोजना राबवीत आहे. त्याअंतर्गत शहरी जनतेला छोट्या-मोठ्या आजारांवर तातडीने उपचार मिळावेत, यासाठी आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शासन निधीही उपलब्ध करून देणार आहे. पण सद्यस्थितीत डॉक्टरच उपलब्ध नसल्याने आरोग्य विभागापुढे पेच निर्माण झाला आहे.

येथील आरोग्यवर्धिनी केंद्र तयारचुंचाळे घरकुल (अंबड), आझाद नगर (सातपूर), समाजमंदिर, महादेव वाडी (सातपूर), विधाते नगर (सातपूर), ज्येष्ठ नागरिक समाजमंदिर (सातपूर), महापालिका समाजमंदिर (नाशिक पश्चिम), जुनी शाळा, उत्कर्ष नगर (नाशिक पूर्व), एनएमसी बिल्डिंग, रंगारवाडा (नाशिक पश्चिम), समाज मंदिर, वाल्मिक नगर (पंचवटी), निलांजली हॉल, स्टेट बँक (सिडको, अयोध्या कॉलनी, मुरलीधरनगर (सिडको), जिजामाता व्यायामशाळा (नाशिकरोड), मनपा इमारत, घाडगे मळा (नाशिकरोड), मनपा व्यायाम शाळा, चाडेगाव (नाशिकरोड), मनपा व्यायामशाळा (चेहडी), नाना नानी पार्क, सौभाग्यनगर (सिडको), गोदावरी सोसायटी (नाशिकरोड), मनपा शाळा, विहितगाव.

टॅग्स :Nashikनाशिक