शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये महापालिकेने नगरसेवक निधीतून एलईडी खरेदीला लावला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 18:42 IST

लोकप्रतिनिधींची धावाधाव : २२,६०० फिटींग्जच्या निविदा रोखल्या

ठळक मुद्दे एलईडी दिव्यांची खरेदी ही शासननियुक्त एनर्जी इफिशियन्सी सर्व्हीस लिमिटेड (ई-ई-एस.एल) या कंपनीकडूनच करावी, असा फतवा बव्हंशी नगरसेवकांनी आपल्या निधीतून एलईडी बसविण्याचे प्रस्ताव दिले होते

नाशिक - महापालिकेने एलईडी दिव्यांची खरेदी ही शासननियुक्त एनर्जी इफिशियन्सी सर्व्हीस लिमिटेड (ई-ई-एस.एल) या कंपनीकडूनच करावी, असा फतवा राज्य शासनाने काढल्याने प्रशासनाने नगरसेवक निधीतून होणा-या एलईडी खरेदीला ब्रेक लावला आहे. त्यामुळे २२ हजार ६०० फिटींग्जसंदर्भातील निविदा रोखण्यात आल्याची माहिती विद्युत विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, नगरसेवक निधीतून एलईडीच्या निविदा प्रकियेला रोख लावल्याने लोकप्रतिनिधींकडून सदर निधी अन्यत्र वळविण्यासाठी धावाधाव सुरू झालेली आहे.महापालिकेत एलईडी घोटाळ्यामुळे शहरातील पथदीपांबाबत गेल्या अनेक वर्षांपासून ओरड आहे. एलईडी खरेदीसंबंधीचा वाद न्यायप्रवीष्ट असल्याने महापालिका त्याबाबत चाचपडत होती. दरम्यान, प्रभागांमध्ये पथदीपांबाबतच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता काही सदस्यांनी त्यासाठी आपला नगरसेवक निधी वापरण्यास सुरूवात केली. सन २०१७-१८ या आथिक वर्षासाठी महापौरांनी प्रत्येकी ७५ लाख रुपयांचा नगरसेवक निधी घोषित केला. त्यानुसार, अधिकाधिक सदस्यांनी आपल्या नगरसेवक निधीतून एलईडी फिटींग्ज बसविण्याची कामे सुचविली. आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१७ या दोन महिन्यात सुमारे २००० एलईडी फिटींग्जच्या निविदा प्रक्रिया होऊन त्याबाबतचे कार्यादेशही काढण्यात आले. त्यानुसार, संबंधित प्रभागात फिटींग्जची कामे सुरू आहेत. मात्र, महापालिकांनी एलईडी दिव्यांची खरेदी ही शासननियुक्त ई-ई-एस.एल या कंपनीमार्फतच करावी असा आदेश काढल्याने प्रशासनाने नगरसेवक निधीतून होणारी एलईडीची खरेदी थांबविल्याची माहिती विद्युत विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. निविदा प्रक्रियेत असलेल्या ७ कोटी २० लाख रुपये किंमतीच्या सुमारे २२ हजार ६०० एलईडी फिटींग्जची खरेदी थांबविण्यात आली असून ई-ई.एस.एल कंपनीमार्फत खरेदी करण्यास यापूर्वीच महासभेने मान्यता दिलेली असल्याने त्यानुसार प्रक्रिया राबविली जाणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. नगरसेवक निधीतून एलईडी खरेदीला ब्रेक लावल्याने सदस्यांची मात्र धावाधाव सुरू झाली आहे. बव्हंशी नगरसेवकांनी आपल्या निधीतून एलईडी बसविण्याचे प्रस्ताव दिले होते. परंतु, आता निधीच त्यासाठी वापरला जाणार नसल्याने त्या निधीतून दुसरी कामे प्रस्तावित करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. मार्च २०१८ अखेरपर्यंतच सदस्यांना चालू वर्षातील नगरसेवक निधीचा वापर करणे अनिवार्य आहे. त्यामुळे सदर निधी व्यपगत होऊ नये, यासाठी सदस्यांनी धावपळ सुरू केलेली आहे.शिवसेनेची आयुक्तांशी चर्चानगरसेवक निधीतून प्रस्तावित केलेली एलईडी फिटींग्जची खरेदी रोखण्यात येऊ नये, यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेऊन चर्चा केली. नगरसेवकांनी दिलेल्या प्रस्तावांमध्ये ज्यांची निविदा प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यांच्या खरेदीला ब्रेक लावू नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली. परंतु, शासनाचे आदेशच असल्याने आयुक्तांनी त्याबाबत असमर्थता व्यक्त केल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका