शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक मनपाचे प्रशासक कैलास जाधव यांना म्हाडा प्रकरण भोवले; रमेश पवार यांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 15:30 IST

महापाालिकेच्या म्हणण्यानुसार ५२ तात्पुरते तर ३० अंतिम अभिन्यास मंजुर करण्या्त आले आहेत. १५७ सदनिका म्हाडाकडे हस्तांतरीत करण्यात आल्या आहेत. तर ४ हजार ३०० सदनिका निर्माणाधिन असून त्या लवकरच म्हाडाकडे हस्तांतरीत करण्यात येणार असून या प्रकरणात कोणत्याही प्रकारची अनियमीता झाला नसल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

नाशिक- शहरात मंजुर अभिन्यास आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी देय असलेल्या सदनिकांची माहिती म्हाडाला वेळेत न दिल्याचे प्रकरण महापालिकेचे प्रशासककैलास जाधव यांना भोवले असून त्यांची विधी मंडळातील चर्चेनंतर मंगळवारी (दि.२३) तडकाफडकी बदली करून बृहन मुंबई महापालिकेचे सह आयुक्त रमेश पवारयांची नियुक्ती करण्यात आली आहे.विधान परीषदेत सोमवारी (दि.२१) विरोधी पक्ष नेता प्रविण दरेकर यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले होतेे.

त्यावर उत्तर देताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याची माहिती दिली होती तर आमदार कपील पाटील यांनी या प्रकरणात सातशे कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर विधान परीषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी महापालिका आयुक्त (प्रशासक) कैलास जाधव यांना हटवण्याचे निर्देश सरकारला दिले हेाते. त्यानंतर मंगळवारी त्यावर नगरविकास खात्याने तडकाफडकी कार्यवाही करीत नाशिक महापालिकच्या आयुक्तपदी बृहनमुंबई महापालिकेचे आयुक्त रमेश पवार यांची नियुक्ती केली आहे.

नाशिक शहरात २०१३ पासून आत्तापर्यंत एक एकर क्षेत्रापेक्षा अधिक किती अभिन्यास मंजुर झाले आणि म्हाडा कडे आर्थिक दुर्बल घटकांसाठी किती घरेदेण्यात आली याची माहिती नोव्हेंबर महिन्यात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नोव्हेंबर महिन्यात मागितली होती. मात्र कोरोना काळामुळे तीवेळेत देता आली नसल्याचे कैलास जाधव यांचे म्हणणे होते. त्यावरून आव्हाड यांनी नाशिक महापालिकेची यासंदर्भात चौकशी करणार असल्याचे सांगितले होते.

महापाालिकेच्या म्हणण्यानुसार ५२ तात्पुरते तर ३० अंतिम अभिन्यास मंजुर करण्या्त आले आहेत. १५७ सदनिका म्हाडाकडे हस्तांतरीत करण्यात आल्या आहेत.तर ४ हजार ३०० सदनिका निर्माणाधिन असून त्या लवकरच म्हाडाकडे हस्तांतरीत करण्यात येणार असून या प्रकरणात कोणत्याही प्रकारची अनियमीता झालानसल्याचा दावा महापालिकेने केला आहे. त्यामुळे प्रशासक कैलास जाधव यांच्या बदलीचे नक्की कारण काय तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तसेचगृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यातील वादाचा हा परीणाम आहे काय असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका