शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

मराठा आरक्षणासाठी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचा राजीनामा 

By संजय पाठक | Updated: October 30, 2023 17:57 IST

मराठा समाज बांधव झाले संतप्त झाल्याने निर्णय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले पत्र

नाशिक- आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने नाशिकच्या छत्रपती शिवाजी स्मारकाजवळ गेल्या ४८ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. आज या आंदोलकांना भेटण्यासाठी गेलेल्या शिंदे गटाचे खासदार हेमंत गेाडसे यांना आंदोलकांनी जाब विचारला आणि समाजासाठी राजीनामा द्या अशी मागणी केली. त्यानुसार हेमंत गोडसे यांनी राजीनामा दिला असून तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर नाशिकमध्ये आंदोलन सुरू करण्यात आले आहे. दोन दिवसांपासून आंदोलकांपैकी नाना बच्छाव यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. दिवसेंदिवस नाशिकमध्ये आंदोलन तीव्र होत असून दीडशेहुन अधिक गावांत राजकीय नेते आणि मंत्र्यांना गावबंदी करण्यात आली आहे. उलट समाजाच्या आक्रमक भूमिकेमुळे अनेक मंत्र्यांचे दौरे आणिकार्यक्रम रद्द होत आहेत.

दरम्यान, आज आंदोलनाच्या ठिकाणी खासदार हेमंत गोडसे भेटण्यासाठी गेल्यानंतर कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. समाजासाठी तुम्हीखासदारकीचा राजीनामा द्या, तुम्हाला आम्ही पुन्हा निवडून आणू असे यावेळी सांगण्यात आले. यानंतर खासदार हेमंत गोडसे यांनी पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा दिला असून मराठा समाजाला आरक्षणे देण्यासाठी पाऊले उचलावीत अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Hemant Godseहेमंत गोडसेMaratha Reservationमराठा आरक्षण