शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या महापौरांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नाला घातला खोडा, स्वच्छ सर्वेक्षणात टॉपटेनमध्ये येण्याबाबत व्यक्त केली साशंकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 20:08 IST

स्वच्छ सर्वेक्षणाचे आव्हान : शिवसेनेकडून मात्र चमकोगिरीबद्दल टीकास्त्र

ठळक मुद्देएका कार्यक्रमात जाहीरपणे पहिल्या दहामध्ये आपण येऊ शकत नसल्याची कबुलीमागील वर्षी केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात नाशिक १५१ व्या क्रमांकावर फेकले गेले होते

नाशिक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांनी दत्तक घेतलेले नाशिक शहर स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या दहा क्रमांकात आलेच पाहिजे, यासाठी आग्रह धरलेला असताना महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या महापौर मात्र, ‘टॉप टेन’बाबत साशंक आहेत. सोमवारी (दि.८) एका कार्यक्रमात त्यांनी जाहीरपणे पहिल्या दहामध्ये आपण येऊ शकत नसल्याची कबुली देत मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नाला मध्येच पूर्णविराम दिला आहे. दरम्यान, शिवसेनेने मात्र स्वच्छ सर्वेक्षणाच्या नावाखाली दररोज पदाधिका-यांकडून होत असलेल्या दौ-याबद्दल टीकास्त्र सोडत ‘ही तर केवळ चमकोगिरी’ असल्याची संभावना केली आहे.मागील वर्षी केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात नाशिक १५१ व्या क्रमांकावर फेकले गेले होते. त्यानंतर महापालिकेत सत्तारुढ झालेल्या भाजपाच्या कारकीर्दीत नाशिकने पहिल्या दहा क्रमांकात आलेच पाहिजे, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला भेट दिली त्यावेळी दिला होता. त्यानंतर, मागील महिन्यात झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्येही मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना पुन्हा जाणीव करून दिली होती. त्यानंतर, गेल्या १ जानेवारीपासून महापौरांसह सत्ताधारी भाजपाचे मनपातील सर्व पदाधिकारी रोज सकाळी पाहणी दौरे करत प्रशासकीय यंत्रणेच्या अकार्यक्षमतेवर आसूड ओढताना दिसून येत आहेत. या दौ-याचे काही परिणामही दिसून येत आहेत. परंतु, सोमवारी (दि.८) रावसाहेब थोरात सभागृहात अवयवदानासंबंधी झालेल्या एका कार्यक्रमात महापौर रंजना भानसी यांनी बोलताना नाशिक हे पहिल्या दहा मध्ये येणार नाही, हे मलाही माहिती आहे परंतु, आपण सर्वांनी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन केले. टॉपटेन शहरामध्ये नाशिक येणार नाही, हे महापौरांनी सांगून टाकल्याने प्रशासकीय यंत्रणा निर्धास्त झाली आहे. दरम्यान, शिवसेनेचे महानगरप्रमुख व विरोधीपक्षनेता अजय बोरस्ते यांनी स्वच्छ सर्वेक्षणाच्या नावाखाली पदाधिका-यांच्या सुरू असलेल्या दौ-याची संभावना ‘ही तर चमकोगिरी’ अशी केली आहे. भल्या मोठ्या वाहनांचा ताफा घेऊन पदाधिका-यांचा हा पाहणी दौरा केवळ देखावा आहे. यापूर्वी नगरसेवक म्हणून राहिलेल्या सत्ताधारी पदाधिका-यांच्या प्रभागात अस्वच्छता दिसून येते, याचा अर्थ गेल्या दहा महिन्यात सत्ताधारी प्रशासनावर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरल्याचे उदाहरण असल्याचीही टीका बोरस्ते यांनी केली आहे.मिशन स्वच्छ सर्वेक्षणमहापालिकेत प्रत्येक अधिकारी हा सध्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या मिशनमध्ये गुंतला आहे. त्यामुळे आपली कामे घेऊन येणाºया आम नागरिकांना संबंधित अधिकाºयांची भेट दुरापास्त झाली आहे. काही अधिका-यांना नगरसेवकांनी कामासाठी फोन केले तर आपण महापौरांच्या दौ-यात आहोत अथवा स्वच्छ सर्वेक्षणाच्या कामात आहोत, अशी उत्तरे दिली जात असल्याच्या तक्रारी आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका