शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

'नाशिकला भरपूर उमेदवार, पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये लक्ष घालावे', छगन भुजबळ यांचा टोला  

By संजय पाठक | Updated: April 25, 2024 11:09 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये लक्ष घालावे त्यांची केंद्रात गरज आहे असे ते म्हणाले. नाशिकमध्ये भाजपाकडे वंजारी समाजाचे अनेक दावेदार असून त्यात हेमंत धात्रक,  बाळासाहेब सानप, शिंदे सेनेचे उदय सांगळे अशी अनेक नावे असल्याचे छगन भुजबळ म्हणाले.

- संजय पाठक नाशिक- बीडमध्ये  प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी भाजपाने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे त्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी काल प्रीतम मुंडे या नाशिक मधून निवडणूक लढू शकतात, अशा प्रकारचे विधान केले होते. मात्र त्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पंकजा मुंडे यांनी आधी बीडमध्ये लक्ष घालावे त्यांना तिथून निवडून येणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले आहे.

आज सकाळी माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी हे विधान केले. नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्याप सुटलेला नसून भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने दावा सांगितल्यामुळे अद्याप उमेदवार निश्चित होऊ शकलेला नाही. छगन भुजबळ यांना तीन महिन्यापूर्वीच भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने नाशिक मधून उमेदवारी करण्यास सांगितले होते. मात्र उमेदवारी घोषित न झाल्यामुळे त्यांनी काही दिवसांपूर्वीच उमेदवाराच्या स्पर्धेतून माघार घेतल्याचे जाहीर केले आहे.

दुसरीकडे बीडमधून प्रीतम मुंडे ऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे यांनी काल अर्ज दाखल करताना घेतलेल्या सभेत प्रीतम मुंडे नाशिक मधून निवडणूक लढू शकतील असे विधान केले होते. या संदर्भात छगन भुजबळ यांनी मात्र वेगळे मत व्यक्त केले. पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये लक्ष घालावे त्यांची केंद्रात गरज आहे असे ते म्हणाले. नाशिकमध्ये भाजपाकडे वंजारी समाजाचे अनेक दावेदार असून त्यात हेमंत धात्रक,  बाळासाहेब सानप, शिंदे सेनेचे उदय सांगळे अशी अनेक नावे असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४nashik-pcनाशिकChhagan Bhujbalछगन भुजबळPankaja Mundeपंकजा मुंडेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४