शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक लोकल निवडणुकीनंतरच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 01:31 IST

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात नाशिक-कल्याण लोकल सेवा सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आल्यानंतर लोकलच्या प्रतीक्षेत असलेल्या नाशिकरांचा मात्र हिरमोड झाला आहे. नाशिक-कल्याण दरम्यान असलेल्या कसारा घाटातील चाचणीत अडचणी येत असल्यामुळे ही लोकल सेवा येत्या सहा महिन्यांत तरी शक्य नसल्याचा दावा मध्यरेल्वेच्या भुसावळ डिव्हिजनने केला आहे. विशेष म्हणजे लोकलची चाचणी घेण्यात आल्याबद्दलची कोणतीही अधिकृत माहिती भुसावळ डिव्हिजनकडेदेखील नसल्याने फेब्रुवारीत लोकल सुरू होण्याच्या घोषणेचे गूढ वाढले आहे. लोकल सुरू करण्याचा निर्णय हा निवडणुकीनंतरच होऊ शकतो, अशी चर्चा असताना काहीही करून महिनाभरात लोकल सुरू करण्याबाबत जोरदार प्रयत्न सुरू असल्याचेही बोलले जात आहे.

ठळक मुद्देप्रतीक्षा कायम : भुसावळ डिव्हिजन अजूनही अनभिज्ञ

नाशिक : फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात नाशिक-कल्याण लोकल सेवा सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आल्यानंतर लोकलच्या प्रतीक्षेत असलेल्या नाशिकरांचा मात्र हिरमोड झाला आहे. नाशिक-कल्याण दरम्यान असलेल्या कसारा घाटातील चाचणीत अडचणी येत असल्यामुळे ही लोकल सेवा येत्या सहा महिन्यांत तरी शक्य नसल्याचा दावा मध्यरेल्वेच्या भुसावळ डिव्हिजनने केला आहे. विशेष म्हणजे लोकलची चाचणी घेण्यात आल्याबद्दलची कोणतीही अधिकृत माहिती भुसावळ डिव्हिजनकडेदेखील नसल्याने फेब्रुवारीत लोकल सुरू होण्याच्या घोषणेचे गूढ वाढले आहे. लोकल सुरू करण्याचा निर्णय हा निवडणुकीनंतरच होऊ शकतो, अशी चर्चा असताना काहीही करून महिनाभरात लोकल सुरू करण्याबाबत जोरदार प्रयत्न सुरू असल्याचेही बोलले जात आहे.नाशिक ते कल्याण दरम्यान फेब्रुवरीच्या दुसºया आवठड्यात लोकल सेवा सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी नाशिकला इतक्यात लोकल मिळणे अशक्य असल्याचे समोर आले आहे. रेल्वेच्या तांत्रिक सल्लागारांनी कसारा घाटाची पाहणी केल्यानंतर घाटात लोकल अशक्य असल्याचे सांगून डेमो लोकल सुरू होऊ शकते असा पर्याय दिला होता. आता तर भुसावळ डिव्हिजनने इतक्या मोठ्या निर्णयाविषयी मात्र कानावर हात ठेवले आहेत. नाशिक- कल्याण दरम्यान घाट असल्यामुळे घाटात लोकल चालविणे अशक्य असल्याचे म्हटले आहे. कोणत्याही मार्गावर लोकल चालविण्याबाबतची चाचणी पूर्ण ही प्रदीर्घ प्रक्रिया आहे. त्यातच घाट सेक्शेन असल्यामुळे लोकलची चाचणी करणे हेच मोठे आव्हान असल्याने घाटातून लोकल चालविण्याबाबत कोणताही मोठा निर्णय तूर्तास नसल्याचे सूत्रांनी सांगितले.दरम्यान, नाशिक-कल्याण दरम्यान लोकल सुरू करण्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात लोकल सुरू करण्याच्या तांत्रिक बाबींची पूर्तता आणि अहवालावरच सर्व काही अवलंबून असणार आहे. तसेच घाटात कुठेच लोकल चालविली जात नसल्यामुळे कसारा घाटातहीते शक्य नसल्याचे यापूर्वीचरेल्वेच्या तांत्रिक समितीने सांगितले आहे.नाशिकच्या लोकल संदर्भात प्रत्यक्षात रेल्वे बोर्डाकडून काहीही जाहीर करण्यात आलेले नाही. नाशिक लोकल संदर्भातील हालचाली नक्कीच सुरू आहेत. परंतु याबाबत चर्चा कितीही असली तरी प्रत्यक्षात लोकल रुळावर येण्यासाठी बराच वेळ लागणार असल्याने एक-दोन महिन्यात नाही किमान वर्षभराची तरी नाशिककरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वे