शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद लवकरच सीसीटीव्हीच्या कक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 23:42 IST

नाशिक : जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये लवकरच सीसीटीव्ही लावण्यात येणार असून, साधारणपणे पुढील महिन्यात या कामकाजाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मागील बजेटमध्ये सीसीटीव्हीसाठी १० लाखांची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार निविदाप्रक्रियादेखील राबविण्यात आली होती.

ठळक मुद्देनिविदाप्रक्रिया पूर्ण : दालनात कॅमेरे लावण्याबाबत नाराजीकॅमेऱ्यामुळे काही अधिकाऱ्यानी नाराजी दर्शविली

नाशिक : जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये लवकरच सीसीटीव्ही लावण्यात येणार असून, साधारणपणे पुढील महिन्यात या कामकाजाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मागील बजेटमध्ये सीसीटीव्हीसाठी १० लाखांची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार निविदाप्रक्रियादेखील राबविण्यात आली होती. सदर प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच जिल्हा परिषदेच्या कामकाजावर सीसीटीव्हीची नजर असणार आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांच्या दालनात लावण्यात येणाºया कॅमेऱ्यामुळे काही अधिकाऱ्यानी नाराजी दर्शविली असून, अधिकाऱ्यावर अविश्वास दाखविण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.जिल्हा परिषदेतील कामकाज आणि ठेकेदारांची कामे यामुळे अनेकदा वाद तसेच आरोप-प्रत्यारोपाच्या घटना घडत असतात. मध्यंतरी एका अभियंत्याच्या दालनात जिल्हा परिषद सदस्य आणि संबंधित अधिकाऱ्यामध्ये चांगलाच वाद झाला होता. ठेकेदार तसेच ग्रामसेवक यांचे अनेकदा अधिकाऱ्याबरोबर होणारे वाद हेही जिल्हा परिषदेत चर्चेचा विषय आहे. काही वर्षांपूर्वी एका अधिकाºयाच्या अंगावर शाई फेकण्याचादेखील प्रकार घडला होता. अशा वादाच्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्हीची आवश्यकता वारंवार प्रतिपादित करण्यात आली होती. आता या साºया प्रकारांवर सीसीटीव्हीची नजर असणार आहे. जिल्हा परिषदेत लवकरच सीसीटीव्ही लावण्यात येणार असून जुन्या आणि नव्या इमारतींवर तसेच कार्यालयीन हॉल, कार्यालयांबाहेरील लॉबी, आवार तसेच वाहतळात कॅमेरे तैनात केले जाणार आहे.सर्वात महत्त्वाचे म्हणजे अधिकाऱ्याच्या दालनातदेखील कॅमेरे लावण्यात येणार असून, यामुळे पारदर्शक कामकाज होण्यास मदत होणार आहे. अनेकदा अधिकाऱ्याच्या दालनात जाऊन शिष्टमंडळ, आंदोलनकर्ते अधिकाºयांवर आरोप करीत असतात. त्यांच्या हालचालीही आता टिपल्या जाणार आहेत. असे असले तरी काही अधिकाºयांनी दालनात कॅमेरे लावण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. यामुळे अधिकाऱ्याच्या व्यक्तिगत आयुष्यावर गदा येणार असून, कामकाजात अनेक अडचणी येण्याची शक्यता आहे किंबहुना केवळ दालनात कुणी आल्या-गेलेल्यांवर नजर ठेवली तरीही अनेक गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असल्याची शंका अधिकाऱ्यानी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद