शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या उद्योगांना नागपुरात आवतण, सवलतीचे पॅकेज, खुद्द मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 04:45 IST

नाशिक येथील उद्योग विदर्भात स्थलांतरित करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला असून काही उद्योजकांशी चर्चा करून त्यांना नागपूरचे आवतण देण्यात आले आहे.

संजय पाठक / लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : येथील उद्योग विदर्भात स्थलांतरित करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला असून काही उद्योजकांशी चर्चा करून त्यांना नागपूरचे आवतण देण्यात आले आहे. विदर्भातील सवलतीमुळे अनेक उद्योजकही सकारात्मक झाले असून, एका उद्योगाने नागपुरात विस्तारीकरणही केले आहे.उत्तर महाराष्ट्राचे मुख्य केंद्र असलेल्या नाशिकमध्ये मुबलक पाणी आणि दळणवळणाच्या सुविधेमुळे उद्योगास पोषक वातावरण आहे. सुवर्ण त्रिकोणातील शहरामुळे मुंबई आणि पुण्यानंतर नाशिकचे नाव घेतले जाते. मात्र गेल्या काही वर्षांत येथे नवीन उद्योग आलेला नाही. सिन्नरचा सेझ रखडला आहे. दिंडोरी क्षेत्राची जागा उद्योजकांना अजूनही योग्य वाटत नाही. यापूर्वीची जकात आणि एलबीटी तसेच एमआयडीसीतील अडचणींमुळे आधीच अनेक उद्योगांनी गुजरात, चेन्नई, उत्तराखंडकडे नवे प्रकल्प सुरू केले आहे. विदर्भात नागपुरला विजेचे दर कमी, त्यात सरकारकडून हमी त्यामुळे येथील उद्योग तेथे जाण्यासाठी तयार होतात. नाशिकमधील मोठ्या उद्योगांना मुख्यमंत्र्यांनीच साद घातल्याचे समजते. एका उद्योगाने नाशिकमध्ये दोन प्रकल्प असताना तिसरा प्रकल्प विदर्भात सुरू केला आहे.विदर्भात सवलतीचे पॅकेज दिले जात असल्याने उद्योजक त्याकडे आकर्षित होत आहेत. नाशिकमधील तीन उद्योजकांना मुख्यंमत्र्यांनी विदर्भात उद्योग सुरू करण्यासाठी निमंत्रित केले आहे. याशिवाय एका मोठ्या कंपनीने नाशिकमधील विस्तारीकरण थांबवून ते नागपूरला केले आहे.- डॉ. डी. एल. कराड,राज्य अध्यक्ष, सीटूविदर्भ-मराठवाड्यातील उद्योगांना वीज दरात सवलत आहे. रोलिंग मिल्ससारख्या उद्योजकांना एक तर दर मार्जिनचे दर कमी करावे लागतील किंवा वीज दरात सवलत मिळेल, अशा ठिकाणी स्थलांतरित व्हावे लागेल.- मधुकर ब्राह्मणकर,अध्यक्ष, निमा

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस