शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक द्राक्ष उत्पादनाची राजधानी: खासदार हेमंत गोडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2022 02:35 IST

द्राक्ष महाेत्सवामुळे जिल्ह्यातील कृषी पर्यटनाला चालना मिळणार आहे. महोत्सवातून शेतकऱ्यांना अधिक दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी प्रेरणा मिळेल. देशात सर्वात उच्च प्रतीच्या द्राक्षांचे उत्पादन नाशिकमध्ये होत असल्याने जिल्हा द्राक्ष उत्पादनाची राजधानी बनली आहे,असे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले. 

ठळक मुद्दे द्राक्ष महोत्सवाचे उद्घाटन

नाशिक : द्राक्ष महाेत्सवामुळे जिल्ह्यातील कृषी पर्यटनाला चालना मिळणार आहे. महोत्सवातून शेतकऱ्यांना अधिक दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी प्रेरणा मिळेल. देशात सर्वात उच्च प्रतीच्या द्राक्षांचे उत्पादन नाशिकमध्ये होत असल्याने जिल्हा द्राक्ष उत्पादनाची राजधानी बनली आहे,असे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले. पर्यटन संचालनालयातर्फे आयोजित दोन दिवसीय द्राक्ष महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी (दि.२६) ग्रेप पार्क रिसोर्ट येथे झाले. याप्रसंगी खासदार गोडसे बोलत होते. व्यासपीठावर जगदीश होळकर, ट्रॅव्हल असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र बकरे, दत्ता भालेराव,सुला वाईनचे उपाध्यक्ष संजीव पैठणकर,सोमा वाईनचे अधिकारी पाचपाटील,कृषीविभाग अधीक्षक सोनवणे उपस्थित होते. विकेंडची पर्वणी साधत पहिल्या दिवशी नाशिककरांनी महोत्सवास हजेरी लावली. उद्घाटन सोहळ्यापूर्वी सकाळी ८ वाजता ‘द ग्रेस ग्रेप एस्केप फॅमिली कार ट्रेझर हंट’ हा कार्यक्रम रंगला. त्यात २० कार सहभागी झाल्या होत्या. नाशिककरांना परिसरातील पर्यटनस्थळांची माहिती व्हावी, पर्यटन क्षेत्राला चालना मिळावी, या उद्देशाने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी द्राक्षांच्या ५३ प्रजाती ठेवल्या असून उपस्थितांनी त्याची माहिती जाणून घेतली. पर्यटन विभागाच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई-राठोड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. महोत्सवात दुसऱ्या दिवशी रविवारी (दि. २६) विनियार्ड व वायनरी टूरचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी नाशिकचा प्रसिद्ध एम.एच.१५ बँडसोबत म्युझिकल कार्यक्रम होईल. याशिवाय कॅलिग्राफी कार्यशाळा व विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असेल. या महोत्सवात विविध वाणांच्या द्राक्षांची माहिती दिली जात असून नाशिककरांचाही चांगला प्रतिसाद लाभत आहे.महोत्सवातील उपक्रमांनी वेधले लक्ष    उद्घाटन सोहळ्यानंतर ११ वाजता द्राक्षांपासून खाद्यपदार्थ तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली. वॉव ग्रुपने त्याचे संयोजन केले. दुपारी १ वाजता लोकनृत्य सादरीकरण झाले. सायंकाळी ४ वाजता आदिवासी वारली चित्रकला प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. आदिवासी कलाकार देवराम पारधी यांनी प्रात्यक्षिक सादर करून सहभागी कलारसिकांना मार्गदर्शन केले. त्यानंतर आसमंतात नाशिक ढोल घुमला. शिवसंस्कृती ढोल ताशा पथकातील युवक,युवतींनी त्यात सहभाग नोंदवला. सायंकाळच्या फॅशन शो ने उपस्थितांचे लक्ष वेधले.कृषिमंत्र्यांनी दिली भेट     कृषीमंत्री दादा भूसे आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी महोत्सवास भेट देत पाहणी केली. कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन संचालनालयाचा हा चांगला उपक्रम आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल,असे मत भूसे यांनी यावेळी व्यक्त केले. 

टॅग्स :Nashikनाशिकmtdc lonarएमटीडीसी लोणारagricultureशेती