शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Nashik: संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान परस्पर बंद, लाभार्थी वंचित

By संदीप भालेराव | Updated: July 12, 2023 13:55 IST

Nashik: महापालिका कार्यक्षेत्रातील संजय गांधी निराधार येाजनेतील लाभार्थी परस्पर अपात्र ठरवून त्यांचे लाभ गेल्या सहा महिन्यांपासून बंद करण्याचा प्रकार करण्यात आला आहे.

- संदीप भालेरावनाशिक - महापालिका कार्यक्षेत्रातील संजय गांधी निराधार येाजनेतील लाभार्थी परस्पर अपात्र ठरवून त्यांचे लाभ गेल्या सहा महिन्यांपासून बंद करण्याचा प्रकार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे लाभार्थी अपात्र ठरविल्याबाबत लाभार्थींना कोणतीही माहिती न देता त्यांना योजनेतून बाद करण्यात आल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार योजनेत दिव्यांग, कुष्ठरोगपीडित, ज्येष्ठ निराधार आदींचा समावेश आहे. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून या लाभार्थींना लाभ दिला जातो. आर्थिक लाभाची ही योजना असल्याने अनेक निराधार, ज्येष्ठ यांना योजनेचा मोठा दिलासा मिळतो; परंतु अचानक योजनेतून बाद केल्याने गेल्या सहा ते सात महिन्यांपासून लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत. विशेष म्हणजे लाभाची वाट पाहून सहा ते सात महिने झाले तरीही अनुदान मिळत नसल्याने चौकशी केली असता लाभ बंद करण्याची माहिती देण्यात आल्याने लाभार्थींना धक्काच बसला.

याप्रकरणी ठाकरे गटाने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे गंभीर प्रकरणाचे लक्ष वेधले. याप्रकरणी देण्यात आलेल्या निवेदनात संजय गांधी निराधार योजना कार्यालयाने नियमांचा भंग करीत चुकीच्या पद्धतीने योजनेतून लाभार्थींना बाद केल्याचे म्हटले आहे. लाभार्थी पात्र आहे की नाही यासाठी वर्षातून एकदा तपासणी करून पात्र-अपात्रतेचे निकष तपासून लाभ बंद करण्याची तरतूद आहे. अपात्र ठरविण्याबाबतची कारणे लाभार्थींना कळविणे अपेक्षित असताना या लाभार्थींना कोणतेही कारण देण्यात न येता परस्पर त्यांना लाभातून बाद करण्यात आले.

निकषांचे उल्लंघन करून चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ घेणाऱ्यांचे लाभ सुरू असताना पात्र आणि गरजू लाभार्थी असतानाही त्यांना अपात्र ठरविण्याचा प्रताप विभागाने केल्याने या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे.

टॅग्स :NashikनाशिकPensionनिवृत्ती वेतनGovernmentसरकार