शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे वर्षा मॅरेथॉनवर पुन्हा नाशिकच्या कन्यांचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 02:20 IST

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत नाशिकच्या मुलींनी सलग अकराव्या वर्षी बाजी मारत पुन्हा नवीन दशकातही वर्चस्व कायम राखण्याचे संकेत दिले. २१ किलोमीटरच्या अर्धमॅरेथॉन गटात नाशिकच्या आरती पाटीलने, तर दहा किलोमीटर गटात कोमल जगदाळे हिने अव्वलस्थान पटकावत ठाणे मॅरेथॉनवर पुन्हा नाशिकचा झेंडा फडकावला.

ठळक मुद्देआरती पाटील, कोमल जगदाळे आपापल्या गटात अव्वल

नाशिक : ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत नाशिकच्या मुलींनी सलग अकराव्या वर्षी बाजी मारत पुन्हा नवीन दशकातही वर्चस्व कायम राखण्याचे संकेत दिले. २१ किलोमीटरच्या अर्धमॅरेथॉन गटात नाशिकच्या आरती पाटीलने, तर दहा किलोमीटर गटात कोमल जगदाळे हिने अव्वलस्थान पटकावत ठाणे मॅरेथॉनवर पुन्हा नाशिकचा झेंडा फडकावला.नाशिकच्या आरतीने २१ किलोमीटरचे हे अंतर १ तास २७ मिनिटे आणि ४७ सेकंदांत पूर्ण केले. आरतीने प्रारंभापासून घेतलेली आघाडी अखेरपर्यंत कायम राखत मोठ्या अंतरासह महिलांच्या अर्धमॅरेथॉनचे विजेतेपद पटकावले. द्वितीय स्थानी आलेल्या प्राजक्ता गोडबोलेने १ तास २८ मिनिटे २५ सेकंदांची वेळ दिली होती, तर कोमलने १० किलोमीटरची शर्यत ३७ मिनिटे ५५ सेकंदांत पूर्ण केली, तर नागपूरच्या निकिता राऊतने द्वितीय क्रमांक पटकावतांना ३८ मिनिटे ३२ सेकंद अशी वेळ दिली.भोसलाची ११व्यांदा बाजीअर्धमॅरेथॉनमध्ये बाजी मारणारी आरती ही नाशिकच्या भोसला सैनिकी स्कूलची विद्यार्थिनी असून, विजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ती सराव करते. सर्वप्रथम २००७ साली नाशिकच्या कविता राऊतने ठाणे वर्षा मॅरेथॉन जिंकत या मॅरेथॉनवरील नाशिकच्या वर्चस्वाला प्रारंभ केला होता. त्यानंतर कविताने सलग चार वर्षे ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर मोनिका आथरे, नंतर संजीवनी जाधव, पूनम सोनवणे आणि यंदा आरती पाटीलने बाजी मारत ११व्यांदा ही शर्यत जिंकून नाशिकचे ठाणे मॅरेथॉनवरील वर्चस्व कायम राखले आहे. केवळ गतवर्षी याच काळात विद्यापीठाची स्पर्धा असल्याने नाशिकच्या महिला धावपटू ठाणे मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्या नव्हत्या.

टॅग्स :NashikनाशिकMarathonमॅरेथॉन