शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Nashik: कॉलेज रोड परिसरामध्ये दुसऱ्या दिवशीही अतिक्रमणे जमिनदोस्त  

By suyog.joshi | Updated: July 2, 2024 19:43 IST

Nashik News: महानगरपालिकेच्यावतीने मंगळवारी (दि.२) सलग दुसऱ्या दिवशीही कॅनडा कॉर्नर ते कॉलेज रोड व गंगापूर रोड परिसरात अतिक्रमण मोहीम राबविण्यात येत अनधिकृत बांधकामांसह रस्त्यावरील शेड, अवैध पार्किंग यांना हटविण्यात आले.

- सुयोग जोशी नाशिक - महानगरपालिकेच्यावतीने मंगळवारी (दि.२) सलग दुसऱ्या दिवशीही कॅनडा कॉर्नर ते कॉलेज रोड व गंगापूर रोड परिसरात अतिक्रमण मोहीम राबविण्यात येत अनधिकृत बांधकामांसह रस्त्यावरील शेड, अवैध पार्किंग यांना हटविण्यात आले. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांचे आदेशान्वये अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, अतिक्रमण उपायुक्त मयूर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कॅनडा कॉर्नर ते कॉलेज रोड परिसरात अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. यामध्ये परिसरातील व्यवसायिकांनी सामासिक अंतर, रूफ टॉप, दुकानांसमोर उभारण्यात आलेले शेड, वाढीव बांधकाम, बाहेरील बाजूस बांधलेले कठडे, ओटे अतिक्रमण पथकाने उध्वस्त केले.

दुकानांसमोर अनधिकृतपणे लावलेले फलक काढून घेण्यात आले. रस्त्यावर थाटलेल्या अनधिकृत व्यावसायिकांचे सामान मनपाच्या अतिक्रमण मोहिमेत जप्त करण्यात आले. या मोहिमेत प्रामुख्याने हॉटेलच्या अनाधिकृत रूफ टॉप पाडण्यात आले. त्यात बिग बाजार समोरील लेन मध्ये पाटील प्लाझा अपार्टमेंट मधील स्काय फाईव्हज, गोदावरी सोसायटी येथील छोटे मिया, हवेली हँग आऊट, अल ओबिया, फ्लाईंग मंक, चार्ली डेक,बहूमल हॉटेल, एयर बार या सात अनधिकृत रूफ टॉप बांधकामावर कारवाई करण्यात आली. या हॉटेलचे रूफटॉप वर असलेले अनाधिकृत हॉटेल अतिक्रमण मोहिमेद्वारे उध्वस्त करण्यात आले. या अतिक्रमण मोहिमेत कार्यकारी अभियंता प्रशांत पगार, रवी बागुल, समीर रकटे, दत्तू शिंगाडे, उपायुक्त नितीन राजपूत विधी अधिकारी वणकर, विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र, सुनिता कुमावत, तुषार आहेर, अंबादास गरकळ यांच्यासह पोलीस विभागातील पोलीस उपायुक्त किरण चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ, पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, देशमुख यासह मनपा अतिक्रमण विभागातील अधिकारी कर्मचारी मोहिमेत सहभागी झाले होते. या प्रकारच्या अतिक्रमण मोहीम नाशिक मनपा हद्दीत पुढे ही अशीच सुरू राहणार आहे. नागरिकांनी व व्यावसायिकांनी आपले अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक