शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
2
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
3
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
4
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
5
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
6
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
7
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
8
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
9
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
10
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
11
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
12
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
13
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
14
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
15
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
16
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

नाशिक निवडणूक निकाल : पुर्वमध्ये सानपविरूध्द ढिकले यांच्यात मोठी चुरस; दोघांमध्ये केवळ ८४५ मतांचा फरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 11:13 IST

Nashik vidhansabha election results 2019बाळासाहेब सानप यांना ११ हजार ९३८ मते मिळाली आहेत. दोघांमध्ये केवळ ८४५ मतांचा फरक असून या मतदारसंघात ‘टफ फाईट’ होताना दिसू लागली आहे.

ठळक मुद्देबाळासाहेब सानप यांना ११ हजार ९३८ मते दोघांमध्ये केवळ ८४५ मतांचा फरक अदोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये धाकधुक निर्माण झाली

नाशिक : पूर्व मतदारसंघात यंदा भाजपविरुद्ध राष्ट्रवादी अशी सरळ सरळ दुरंगी लढत होत असून, दोन्ही तुल्यबळ उमेदवार असले तरी, या मतदारसंघात ऐनवेळी घडलेल्या राजकीय घटना, घडामोडी पाहता, त्यात कोण बाजीगर ठरतो याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. पाचवी फेरी पुर्ण झाली असून भाजपचे राहुल ढिकले यांना १२ हजार ७८३ मते तर बंडखोरी के रून मनगटावर घड्याळ बांधून रिंगणात उतरलेले बाळासाहेब सानप यांना ११ हजार ९३८ मते मिळाली आहेत. दोघांमध्ये केवळ ८४५ मतांचा फरक असून या मतदारसंघात ‘टफ फाईट’ होताना दिसू लागली आहे. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये धाकधुक निर्माण झाली आहे.निवडणूक जाहीर झाल्यापासून पूर्व मतदारसंघात अनेक राजकीय घटना घडामोडी घडल्या. भाजपचे आमदार व शहराध्यक्ष असलेल्या बाळासाहेब सानप यांना पक्षाने उमेदवारी देऊ नये यासाठी सानप विरोधकांनी पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या, तर सानप समर्थकांनीही उमेदवारी मिळावी यासाठी शक्तिप्रदर्शन केले; परंतु पक्षाने अखेरच्या दिवसापर्यंत सानप यांना उमेदवारी दिली नाही, उलटपक्ष मनसेकडून इच्छुक असलेले राहुल ढिकले यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज सानप यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधून उमेदवारी अर्ज दाखल केला.या मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने माजी महापौर अशोक मुर्तडक यांना उमेदवारी दिली. त्यांनी नामांकनही भरले; परंतु माघारीच्या दिवशी नाट्यमय घडामोडीत मुर्तडक यांनी माघार घेतली. त्यांच्या माघारीने कोणाला राजकीय लाभ होईल हे नव्याने सांगण्यास नको; मात्र याचवेळी कॉँग्रेस आघाडीतच बिघाडी झाली. जागावाटपात पूर्वची जागा कॉँग्रेसच्या वाट्याची असल्याने ही जागा कॉँग्रेसने कवाडे गटाला सोडलेली असताना राष्ट्रवादीने सानप यांना उमेदवारी देऊन बिघाडी केली; मात्र मतदारसंघात भाजपविरुद्ध राष्ट्रवादी असे चित्र निर्माण होत असताना कवाडे गटाचे गणेश उन्हवणे यांनी माघार घ्यावी यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न केले गेले. त्यात यश मिळू शकले नाही. त्यामुळे वरकरणी या मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र असले तरी, खरी लढत सानपविरुद्ध ढिकले अशीच आहे. दोन्ही पक्षांनी आयात उमेदवार दिल्याने जुने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची त्यांना निवडणुकीत कितपत साथ मिळते हा प्रश्नच आहे.--विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेत २००९ मध्ये नाशिक पूर्व मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली. या मतदारसंघात पंचवटी, मखमलाबाद, नाशिकरोड, आडगाव, जेलरोड, पंचक, दसक या भागांचा समावेश आहे. शहरी व ग्रामीण असे संमिश्र मतदार आहेत.२००९ मध्ये विधानसभा निवडणुकीत आघाडी विरुद्ध युती आणि मनसे अशी तिरंगी लढत झाली. त्यात मनसेने उत्तमराव ढिकले यांना उमेदवारी दिली व त्यांनी बाजी मारली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे देवीदास पिंगळे यांनी बंडखोरी केली होती. मात्र त्याचा फायदा मनसेलाच झाला.२०१४ च्या निवडणुकीत युती आणि आघाडी तसेच मनसेने स्वतंत्र निवडणुका लढविल्या. त्यावेळी मोदी लाटेत भाजपच्या बाळासाहेब सानप यांनी बाजी मारली. गेल्या पाच वर्षांत या मतदारसंघातील अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Result Day Assembly Electionनिकाल दिवस विधानसभा निवडणूकnashik-east-acनाशिक पूर्व