नाशिक : नाशिक विभागाच्या कार्यकक्षेत नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश असून, विभागाचा निकाल ८७.७६ टक्के लागला आहे. या चारही जिल्ह्यांमधून एकूण एक लाख ७७ हजार ६९३ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत पास झाले आहेत. एकूण २ लाख २ हजार ४७८ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. सर्वाधिक निकाल धुळे जिल्ह्याचा लागला आहे.नाशिक विभागात दहावीच्या परीक्षेत मुलींनी वर्चस्व कायम ठेवले असून, मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण सर्वाधिक धुळे जिल्ह्यात (९२.२७ टक्के) आहे. नाशिक जिल्ह्यात मुलींनी बाजी मारत मुलांना पुन्हा एकदा मागे टाकले आहे. जिल्ह्णातून ३७ हजार ५७ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. संपूर्ण विभागात नाशिकमधून सर्वाधिक मुले-मुली परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. विभागातून मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८५.५०, तर मुलींचे ९०.६९ टक्के इतके आहे. संपूर्ण विभागातून ९७ हजार ७७७१ मुले, तर ७९ हजार ९२२ मुली दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. याबरोबरच राज्यातील नऊ विभागीय मंडळातून मुलींचा निकाल ९१.४६ तर मुलांचा ८६.५१ टक्के लागला आहे. राज्यभरातून १६ लाख ४४ हजार १६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यापैकी १४ लाख ५८ हजार ८५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्याचा निकाल ८८.७४ टक्के लागला आहे. यावर्षी तीन विषयांची अतिरिक्त भर पडली व एकूण ५६ विषयांची परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये १० विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. बुधवारपासून (दि.१४) गुणपडताळणी व छायाप्रतींसाठी अर्ज करता येणार आहे.विभागात धुळे आघाडीवरदहावीच्या निकालाच्या दृष्टीने राज्यात नाशिकचा यावर्षीही सहावा क्रमांक लागला आहे. विभागात नाशिक जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर असून, धुळे जिल्ह्णाने आघाडी कायम ठेवली आहे. कोकण (९८.१८ टक्के) प्रथम तर सर्वाधिक कमी यंदा नागपूर विभागाचा (८३.६७) निकाल लागला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत नाशिक विभागाच्या निकाल दोन टक्क्यांनी कमी झाला आहे; मात्र मुलींनी विभागात आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. गेल्या वर्षी नाशिक विभागाचा निकाल ८९.६१ टक्के लागला होता, तर यावर्षी निकाल ८७.७६ टक्क्यांवर आला आहे.जिल्हानिहाय निकाल असा-जिल्हा टक्केनाशिक -८७.४२धुळे -८९.७९जळगाव-८७.७८नंदुरबार -८६.३८एकूण =८७.७६——————————-विद्यार्थ्यांची जिल्हानिहाय टक्केवारीजिल्हा मुले मुलीनाशिक८४.८०९०.६५धुळे ८७.९८९२.२७जळगाव८५.६८९०.७१नंदुरबार८४.४०८८.७९
नाशिक विभागाचा निकाल ८७ टक्के
By admin | Updated: June 13, 2017 23:46 IST