शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यातील खते, कीटकनाशके तपासणीत अधिकारी ‘नापास’; पेठ तालुक्यात पाटी ‘कोरीच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 13:41 IST

नाशिक : कीटकनाशके फवारणीवरून खते व कीटकनाशके विक्रेत्यांनी सरकारविरोधात दंड थोपटले असताना नाशिक जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने मात्र त्यांची ही दुकाने तपासणीची कारवाई या धाकामुळेच ‘आस्ते-कदम’ सुरू ठेवल्याचे चित्र आहे. ३० सप्टेंबर २०१७ अखेर खते, बियाणे व कीटकनाशके विक्री केंद्रांच्या तपासणीचे लक्ष्य सरासरी ५५ ते ५८ टक्केच राहिल्याची धक्कादायक माहिती ...

ठळक मुद्देबियाणे विक्री केंद्रे तपासणीचे १५२४ लक्ष्य कीटकनाशके विक्री केंद्र तपासणीचे १४८३ इतके उद्दिष्ट

नाशिक : कीटकनाशके फवारणीवरून खते व कीटकनाशके विक्रेत्यांनी सरकारविरोधात दंड थोपटले असताना नाशिक जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने मात्र त्यांची ही दुकाने तपासणीची कारवाई या धाकामुळेच ‘आस्ते-कदम’ सुरू ठेवल्याचे चित्र आहे. ३० सप्टेंबर २०१७ अखेर खते, बियाणे व कीटकनाशके विक्री केंद्रांच्या तपासणीचे लक्ष्य सरासरी ५५ ते ५८ टक्केच राहिल्याची धक्कादायक माहिती समोेर आली आहे.कृषी आयुक्तांची खरीप हंगाम २०१७ आढावा व रब्बी हंगाम २०१७-१८ नियोजनाबाबत बैठक असून, त्यानिमित्ताने कृषी विभागाने केलेल्या संक्षिप्त माहितीतून हे वास्तव उघड झाल्याचे कळते. जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी, मोहीम अधिकारी तसेच जिल्हा कृषी अधिकारी यांच्यासह पंचायत समिती कृषी निरीक्षकनिहाय दरमहा खते, बियाणे व कीटकनाशके केंद्रे तपासणीचे लक्ष्य दिलेले असते. त्यानुसार ३० सप्टेंबर २०१७ अखेर खते विक्री केंद्रांचे एकूण २०६८ केंद्रे तपासणीचे लक्ष्य असताना प्रत्यक्षात अवघे ९७६ (४७ टक्के) खते विक्री केंद्रांची तपासणी झाल्याचे समजते. तसेच बियाणे विक्री केंद्रे तपासणीचे १५२४ लक्ष्य असताना प्रत्यक्षात ८८५ (५८ टक्के) बियाणे विक्री केंद्रांचीच तपासणी करण्यात आल्याचे कळते. इतकेच नव्हे तर ज्या कीटकनाशके फवारणीवरून राज्यभर रणकंदन सुरू आहे त्या कीटकनाशके विक्री केंद्र तपासणीचे १४८३ इतके उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात ८२० कीटकनाशके विक्री केंद्रांचीच तपासणी करण्यात आल्याची माहिती यानिमित्ताने समोर आली आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक