शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्हा परिषद ‘पंचायत राज’च्या दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 15:56 IST

गेल्यावर्षी जिल्हा परिषदेत येऊन येथील दप्तर तपासणी आणि कामांची चौकशी करून काही आक्षेप नोंदविले होते. या आक्षेपांसदर्भातील सुनावणी आता मुंबईत सुरू असून, जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी मुंबईला रवाना झाले आहेत.

ठळक मुद्देसुनावणी : सर्व अधिकारी मुंबईला रवानादोन दिवस येथील कामकाज राहणार ठप्प

नाशिक : बळकट पंचायत राज व्यवस्थेमार्फत पूर्णत्ववादी व सर्वसमावेशक तसेच चिरस्थायी ग्रामविकास साधण्यासाठी पंचायत राज विभागाच्या वतीने ग्रामविकासावर लक्ष केंद्रित केले जाते. ग्रामविकासाचे ध्येय असणाऱ्या  पंचायत राज समितीने गेल्यावर्षी जिल्हा परिषदेत येऊन येथील दप्तर तपासणी आणि कामांची चौकशी करून काही आक्षेप नोंदविले होते. या आक्षेपांसदर्भातील सुनावणी आता मुंबईत सुरू असून, जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी मुंबईला रवाना झाले आहेत.स्वर्णजयंती ग्रामविकास योजनेंतर्गत ग्रामीण महाराष्ट्रत सामाजिक न्याय आणि मूलभूत सार्वजनिक सुविधा राबविण्यासाठी असलेल्या विविध योजनांच्या माहितीचा आढावा पंचायत राज समितीकडून घेतला जातो. यासाठी जिल्हा परिषदेच्या कामकाजाची पाहणी करण्यात आली होती. शासकीय योजना, त्यांचे नियोजन, व्यवस्थापन आणि लेखापरीक्षणाच्या पातळीवर जिल्हा परिषदेच्या अनेक फाईल्सची तपासणी करून समितीने स्पष्टीकरणाचाही शेरा मारला असल्याचे समजते. या संदर्भातील त्रुटी आणि निराकरण करण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची  विशेष सुनावणी सुरू झाली आहे. बुधवार आणि गुरुवार अशी दोन दिवस सदर सुनावणी होणार आहे.या सुनावणीसाठी जिल्हा परिषदेचे सर्वच अधिकारी मुंबईकडे रवाना झाल्याने अधिकाऱ्यांच्या दालनाला कुलपे लावण्यात आली होती. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपासून ते उपमुख्य कार्यकरी अधिकारी, तसेच खातेप्रमुखही मुंबईला गेल्याने जिल्हा परिषदेत बुधवारी बऱ्यापैकी  शांतता जाणवत होती. गुरुवारीदेखील सुनावणी असल्याने जिल्हा परिषदेचे कामकाज गुरुवारीदेखील ठप्प राहणार आहे. जिल्हा परिषदेचे सर्वच दप्तर पंचायत राजच्या दारी नेण्यात आल्यामुळे दोन दिवस येथील कामकाज ठप्प राहणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद